भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. तिसऱ्याच दिवशी हा सामना जिंकून भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं आणि विजय मिळवला.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना तिसरा दिवस संपण्याआधीच संपला. भारताने हा सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात टॉस भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. भारताने 8 विकेट गमवून 564 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताने ठेवलेल्या 564 धावांचा पाठलाग करणं अफगाणिस्तानला जमलं नाही. पहिला डाव 152 धावांवर आवरला. 412 धावा असल्याने फॉलोऑन दिला गेला. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 112 धावा करता आल्या. भारताने हा सामना एक डाव आणि 300 धावांनी जिंकला. भारताविरुद्ध अफगाणिस्तानची कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने 103 आणि 109 धावांवर सर्वबाद केला होतं. आता दुसऱ्या दावत 112 धावांवर बाद केलं.
अफगाणिस्तानचा हा भारताकडून सगळ्यात मोठा पराभव आहे. अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. याआधी भारतानेच अफगाणिस्तानला 2018 मध्ये एक डाव 262 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. 2018 मध्ये राजकोटमध्ये वेस्ट इंडिजला एक डाव आणि 272, 2018 मध्ये अफगाणिस्तानला बांगळुरूत एक डाव आणि 262 धावा, 2007 मध्ये बांगलादेशला मिरपूरमध्ये एक डाव आणि 239 धावा आणि 2017 मध्ये श्रीलंकेला नागपूरमध्ये एक डाव आणि 239 धावांनी नमवलं होतं.
आशियाई संघाने मिळवलेला दूसरा सर्वात मोठा विजय आहे. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकिस्तानने 2002 मध्ये लाहोरमध्ये न्यूझीलंडला एक डाव आणि 324 धावांनी पराभूत केलं होतं. आता भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #indvsagf #bcci