अफगानिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून किंग कोहली बाहेर पडल्याचे समोर येत आहे. विराट दुखापतीमुळे ही मालिका खेळू शकणार नाही.
टीम इंडियाचा किंग विराट कोहली जखमी झाल्यामुळे अफगानिस्तान विरुध्दच्या वनडे सामन्यात सहभागी होणार आसल्याचे समोर येत आहे. विराटला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळं वनडे मालिकेतून बाहेर गेल्याचं वृत्त पीटीआयकडून देण्यात आलं आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहिती नुसार विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळं अफगानिस्तानविरुध्दच्या वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे. भारत आणि अफगानिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 13 जूनपासून भारतात होणार आहे.
भारत आणि अफगानिस्तान यांच्यात 6 जूनपासून कसोटी सुरू होणार आहे, त्यानंतर 13 जूनपासून वनडे सामना सुरू होणार आहे. पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. विराट कोहलीनं आयपीएल मध्ये दमदार खेळी खेळली. आयपीएलच्या फायनल सामन्यात नाबाद राहून अरसीबी संघाला आयपीएलची ट्रॉफी मिळवून दिली. मात्र, आता अफगानिस्तान विरुध्दची मालिका सुरू होण्यापूर्वी हॅमस्ट्रिंग दुखपतीमुळं तो वनडे संघाबहेर गेला आहे.
विराट कोहलीनं आयपीएल फायनल सामन्यात 42 बॉल मध्ये 75 धावांची पारी खेळली होती. अरसीबीनं विराटच्या खेळीमुळे आयपीएल फायनल 5 विकेटनं जिंकली. फायनल मध्ये विराट कोहलीला धावताना त्रास होतं असल्याचं दिसलं. विराटनं 16 मॅच मध्ये 675 धावा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता विराट अफगानिस्तानविरुध्दच्या मालिकेतून दुखपतीमुळं बाहेर गेला असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पुढील महिन्यात इंग्लंड विरुध्दच्या मालिकेत तरी विराट कोहली खेळणार आहे की नाही असं प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.
आयपीएलपूर्वी न्यूझीलंड विरुध्दच्या वनडे मालिकेत विराट कोहलीनं तीन सामन्यात 240 धावा केल्या होत्या. त्यामध्ये एका शतकाचा आणि अर्धशतकाचा समावेश होता. आता अफगानिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटची जागा कोण भरून काढणार हे बीसीसीआयनं स्पष्ट केलेलं नाही. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या फिटनेससवर ते खेळणार की नाही हे अवलंबून आहे. भारतीय वनडे संघात शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी यांचाही समावेश आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #bcci #viratkohli