रविवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मात्र आज मतमोजणी आधीच केंद्रासमोरील खुर्चीवर लिंबू, अंगारा, आणि अगरबत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरात मतमोजणी केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आला आहे. चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील हा प्रकार आहे. केंद्रा बाहेर खुर्चीवर लिंबू, अंगारा, आणि अगरबत्ती ठेवल्याचं समोर आलं आहे. जवळपास एक दशकानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडवुक झाली. कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी महामंडळाच्या मतदानाकडे पाठ फिरवली आहे. या निवडणुकीत 49.90 टक्के इतकं कमी प्रमाणात मतदान झालं. आज (सोमवारी) मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्राबाहेरच्या खुर्चीवर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला.
चित्रपट महामंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर उरलेल्या 14 जागांसाठी 44 उमेदवारांमध्ये पैज लढवल्या जात आहे. अभिनेत्री वर्ष उसगावकर, संगीत क्षेत्रातील आनंद शिंदे आणि विजय खोंचीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीदारम्यान राजकीय ढवळाढवळचा आरोपही समोर आले आहेत. अभिनेते विजय पाटकर यांनी काही व्यक्तींनी राजकारण करून उमेदवारी प्रक्रियेत अडथळे आणल्याचा आरोप केला आहे. एक मंत्रीचा ओएसडी मागच्या चार दिवसांपासून कोल्हापुरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणत आहे. त्यांच्या बाजूने हा व्यक्ति नको तो व्यक्ति नको असं सांगितलं जात आहे. मला एक कळात नाही त्या मंत्र्यांची आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामं संपली आहेत का? जेणेकरून ते चित्रपट महामंडळात आसन टाकून बसले आहेत. गेले 40 वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं,” असा आक्रमक प्रश्न पाटकर यांनी केला होता.
दरम्यान, कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून, निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. मतमोजणी केंद्राबाहेर आढळलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे मात्र या निवडणुकीला आणखी एक नवे विवादस्पद वळण मिळाले आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #maharashtra