नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि जळगावमध्ये रेश्मा काळे यांच्या बंडखोरीमुळे दोन्ही विधान परिषद निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत नाशिक आणि जळगाव या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे सूर उमटल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. बिनविरोध निवडीच्या चर्चांना आता मोठा धक्का बसला असून महायुतीसमोर अंतर्गत नाराजीचे आव्हान उभे राहिले आहे.
नाशिकमध्ये महायुतीने शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली असून भाजपचे इच्छुक गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत थेट निवडणुकीच्या मैदानात उडी मारली आहे. कुणाल दारडे यांनी गोकुळ गीते यांना फोन वरुण धमकी दिल्यामुळे गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर आता ठाम राहिले आहेत. ‘आमचा बाप काढल्यामुळे मे अत्यंत नाराज आहे, आता कोणत्याही परिसतहतीत माघार घेणार नाही’ असं गोकुळ गीते म्हणले आहेत. त्यामुळे नाशिक मध्ये आता बिनविरोध निवडणुकीची शक्यता संपली आहे. तर आता नाशिकमध्ये नरेंद्र दारडे आणि गोकुळ गीते यांच्यात निवडणूक होणार आहे.
दुसरीकडे जळगावमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपचे नंदकिशोर महाजन मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याचवेळी शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी कायम ठेवली.
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी बंडखोर उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांची चिंता वाढवली आहे. अर्ज माघार घेण्याची वेळ आता संपलेली असून हे चित्र स्पष्ट झाले आहे की गोकुळ गीते हे आता माघार घेणार नाही आहेत.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #vidhansabhaelection #politics