Sarvangasana

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

662 0

सर्वांगासन (Sarvangasana) हा एक संस्कृत शब्द आहे. शरीराच्या सगळ्या अवयवांचे आसन म्हणून या आसनाची ओळख आहे.  सर्वांगासन हा शब्द तीन शब्दांना एकत्र करुन बनवण्यात आला आहे. सर्व म्हणजे संपूर्ण. दुसरा शब्द आहे ज्याचा अर्थ आहे भाग किंवा अवयव. तिसरा शब्द आसन ज्याचा अर्थ आहे की एका विशिष्ट स्थितीमध्ये उभे राहणे, बसणे असा होतो. तीन्ही शब्दांना एकत्र करून सर्वांगासन हा शब्द तयार झाला आहे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार खांद्यावर घेऊन शीर्षासनासारखे उलटे अशा स्थितीत केले जाते. म्हणून या आसनाला कंदरासन असे ही म्हणतात.

सर्वांगासन करण्यामुळे शरीराला होणारे फायदे
1. खांदे मजबूत करते
खांदे मजबूत बनवून त्यांना टोन करते. ज्यांचे खांदे कमजोर आहेत आणि पुढच्या बाजूला झुकलेले आहेत त्यांच्यासाठी हे आसन खूप चांगले आहे.

2. मान मजबूत करते
सर्वांगासनाच्या नियमित सरावामुळे स्पॉन्डिलायटीस किंवा मान आखडणे यासारख्या त्रासापासून आराम मिळतो.

3. रनर्ससाठी चांगले आहे
सर्वांगासन पाय, हॅमस्ट्रिंग आणि कमरेचे स्नायूंना टोन करते. अ‍ॅथलीट्स विशेषत: धावण्याचा व्यायाम करणार्‍यांसाठी हे योगासन खूप उपयोगी आहे. या आसनामुळे पायांमधील रक्त परत शरीराकडे जाते. धावताना स्नायू थकतात अशावेळी याच्यामुळे पायाच्या स्नायूंमधील रक्त परत जाण्याच्या प्रक्रियेमुळे हा प्रॉब्लेम दूर होतो.

4. पाठीला मजबूत करते
पाठ उचलण्यामुळे आणि शरीर बॅलन्स करण्यामुळे पाठीला मजबूत करायला मदत होते.

5. कणा मजबूत करते
सर्वांगासन केलामुळे पाठीच्या कण्याला ताकद मिळते तसेच तो लवचिक होतो. तसेच या आसनामुळे नर्व्हस सिस्टीमची काम करण्याची क्षमता वाढते.

सर्वांगासन करण्याचे टप्पे
•  योगा मॅटवर पाठीवर झोपावे
• खांद्याच्या खाली गोधडी ठेऊन आधार द्यावा
• दोन्ही हात शरीराशेजारी ठेवा.
• दोन्ही पाय सरळ वरच्या दिशेने उचला.
• हळू हळू पाय डोक्याच्या दिशेने न्या.
• दोन्ही हातांनी कंबरेला आधार द्या.
• हाताची बोटे वरच्या बाजूने यायला हवीत.
• पाय वरच्या बाजूने न्या.
• खांदा, पाठीचा कणा एका सरळ रेषेत यायला हवा.
• या स्थितीत 30  सेकंदापासून ते 3 मिनिटे रहा.
• आता हळू हळू पाठ पुन्हा योगा मॅटवर आणावी.
• पायांना हळू हळू योगा मॅटवर आणावे.

जर तुम्हाला खालीलपैकी काही त्रास असेल तर सर्वांगासन करु नये
हाय ब्लड प्रेशर असणार्‍या लोकांनी सर्वांगासन करु नये.
डायरियाचा त्रास असेल तर हे आसन करु नये.
संधीवात किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर सर्वांगासन करु नये.
मान दुखत असेल तर हे आसन करताना मानेवर भार देऊ नये.
सुरुवातीला आसन करताना योग शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे.
बॅलन्स जमायला लागल्यावर हे आसन स्वत:चे स्वत: करु शकता.
सर्वांगासन करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्या.

Share This News

Related Post

Anjaneyasana

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Posted by - March 5, 2024 0
तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी अंजनेयासन (Anjaneyasana) हे अतिशय उपयुक्त योगासन आहे. याच्या सरावाने फुफ्फुसाची क्षमता तर सुधारतेच, पण या आसनाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *