You Tube

Youtube ची मोठी कारवाई ! भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले

759 0

लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने (Youtube) जगभरात मोठी कारवाई केली. युट्यूबने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन जगभरातील 90 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओ भारतामधील आहेत.भारतातील 22.5 लाखांहून अधिकचे व्हिडिओ युट्यूबवरुन हटविण्यात आले आहेत. गुगल कडून ही कारवाई करण्यात आली आहे. कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन करणे या क्रिएटर्सला महागात पडले असून ही आकडेवारी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत सर्वाधिक आहे.

युट्यूब चॅनल्स आणि कमेंटवर पण कारवाई
नुकसानदायक आणि धोकादायक व्हिडिओची संख्या सर्वाधिक आढळली असून एकूण डिलीट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये यांची संख्या 39.2 टक्के इतकी आहे. या सोबतच मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक व्हिडिओंचा क्रमांक असून एकूण व्हिडिओत असे 32.4 टक्के व्हिडिओ हटविण्यात आले आहेत. तर 7.5 टक्के हिंसक व्हिडिओ , 5.5 टक्के प्रौढ कंटेट असणाऱ्या व्हिडिओला हटवण्यात आले आहे. लोकांची दिशाभूल करणे, प्रेक्षकांना फसविणारे, आमिषाला बळी पाडणारे असे जवळपास 2 कोटींहून अधिक युट्यूब चॅनल्स या प्लॅटफॉर्मवरुन बंद करण्यात आले आहेत. याशिवाय 1.1 अब्ज कमेंट डिलीट करण्यात आल्या असून 99 टक्के कमेंट आपोआप डिलीट करण्यात आल्या आहेत.

YouTube गाईडलाईन्स काय आहेत?
स्पॅम कंटेंट : फेक कंटेंट आणि स्वतःची ओळख लपवून कंटेट तयार करणे

संवेदनशील माहिती : लहान मुलांची सुरक्षा, अंबट शौकीनांसाठीचा कंटेट, मृत्यूस कारणीभूत ठरणारा कंटेट

हिंसक आणि धोकादायक कंटेट : शोषण आणि सायबर बुलिंग, हेट स्पीच या पट्टीत मोडणारे

दिशाभूल : सरकार वा मोठ्या ब्रँडचे नाव वापरुन खोटी माहिती प्रसारीत करणे, दिशाभूल करणे. निवडणूक आणि औषधींसंबंधीची चुकीची माहिती देणे

आयुधांचा वापर : युट्यूबवरील कमेंट्स, कृत्रिम बुद्धीमता यांचा वापर करुन कम्युनिटी गाईडलाईन्स लागू करण्यात येतात. क्रिएटर्सची पूर्वीपीठिका, राजकीय विचार, त्याचा कल यांचा पण विचार करण्यात येतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha News : भाजपला मोठा धक्का ! मोहिते पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

Raksha Khadse : चर्चेतील चेहरा : रक्षा खडसे

Lok Sabha Elections : भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Sadanand Date : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डायरेक्टर जनरलपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News

Related Post

Suicide

धक्कादायक ! जळगावमध्ये महिलेची पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Posted by - May 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने तिच्या पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह शेतातील विहिरीत उडी…
Kolhapur Crime

Kolhapur Crime : मुलगा, सून आणि नातीची वृद्ध आजीला मारहाण; धक्कादायक Video आला समोर

Posted by - April 20, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur Crime) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मुलगा, सून आणि नात एका वृद्ध आजीला मारहाण…

बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ चित्रपट प्रदर्शित, पाहा ट्रेलर

Posted by - March 25, 2022 0
मुंबई- एसएस राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ हा चित्रपट आज, २५ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक सिनेप्रेमी ज्याची आतुरतेने वाट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *