VIDEO : सोनपाखरू हरवलं ! एकेकाळी बालगोपाळांसाठी आकर्षण ठरलेली दुर्मीळ कीटक प्रजाती संकटात… पाहा

486 0

चंद्रपूर : साधारणत: पंधरा-वीस वर्षांपूर्वी सोनपाखरू हा बालकांचा सर्वाधिक आवडता मित्र ठरला होता मात्र बालकांसाठी विशेष आकर्षण ठरलेलं हे सोनपाखरू आता दिसेनासं झालंय. कधी काळी बालगोपालांचं विश्व व्यापून टाकलेलं हे सोनपाखरू आता दुर्मिळ झाल्यानं ही कीटक प्रजाती आता संकटात आलीये.

See the source image

एकेकाळी लहान मुलं अगदी आपल्या अंगाखांद्यावर सोनपाखराला खेळवायची. सोनपाखरांची रंगीबेरंगी अंडी जास्त कुणाकडं आहेत याची जणू पैज लागायची पण आता मोबाईल हाताळणाऱ्या चिमुकल्या हातांना सोनपाखराचा स्पर्श अनोळखी बनलाय. भारतातील अत्यंत सूंदर, आकर्षक किटकांपैकी एक म्हणजे सोनपाखरू. ग्रामीण भागात सोनपाखरू या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कीटकाचं शास्त्रीय नाव ” इंडीयन ज्वेल बिटल” असं आहे. ही एक कीटक प्रजाती आहे.

See the source image

साधारणत: पंधरा-वीस वर्षांपूर्वी हे सोनपाखरू हमखास काटेरी झूडपावर सापडायचं. या कीटकाला पकडण्यासाठी मुलं धावत सुटायची. या कीटका इतकीच सुंदर त्याची अंडी सुंदर असायची. या कीटकाला मुलं आगपेटीत ठेवायची. झाडाझुडपांवर सहजपणे आढळणारं हे सोनपाखरू आता केवळ फोटोत पाहायला मिळणं हे आपलं आणि विशेषतः आजच्या मुलांचं दुर्दैवच ! पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे याबाबत काय म्हणतायत पाहूयात…

Share This News

Related Post

मुख्यमंत्र्यांचे ठरले ! येत्या ९ एप्रिलला रामल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार

Posted by - April 3, 2023 0
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मागील…
Byculla Fire

Byculla Fire : मुंबईतील भायखळा येथे 57 मजली इमारतीला भीषण आग

Posted by - June 2, 2024 0
भायखळा : दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील एका उंच इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग (Byculla Fire) लागली. या भीषण आगीमध्ये अनेकजण…
Pune Crime News

Pune Crime News : गुडलक चौकात श्वानाला धडक देऊन ठार मारणाऱ्या लेम्बोर्गिनी कार चालकाला अटक

Posted by - August 13, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune Crime News) गुडलक चौकात एका लेम्बोर्गिनी कारने दिलेल्या धडकेत एका कुत्र्याला आपला जीव गमवावा…
Crime News

Crime News : कुटुंबावर दुःखाचा डोंगर ! गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 18, 2023 0
आपले लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. सगळीकडे याची तयारी सुरु असताना कोकणातील बांदा या ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *