Deepfake Technology

Deepfake Technology : रश्मिकानंतर आलिया भट्ट ‘डीपफेक’ची शिकार; Video व्हायरल

676 0

मुंबई : आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे डीपफेक टेक्नॉलॉजी (Deepfake Technology). या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा हुबेहुब चेहरा आणि आवाज बदलण्याचा चमत्कार करता येतो. सर्वसामान्य माणसांना हे व्हिडीओ खरे वाटतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर आलियाच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
सध्या सोशल मीडियावर आलियाचा डीपफेक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आलियाला अतिशय बोल्ड अंदाजात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहाताच क्षणी लक्षात येत आहे की हा फेक व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी खरी मुलगी कोण आहे? काय करते? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना, काजोल, कतरिना कैफ आणि सारा तेंडुलकर या डीपफेक व्हिडीओच्या शिकार झाल्या होत्या.

https://www.instagram.com/reel/C0Cf17WyyVr/?utm_source=ig_embed&ig_rid=0895ec09-5b01-4d2f-80b7-5d54ba76e3ec

डीपफेक तंत्रज्ञान नेमके आहे तरी काय?
डीपफेक तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्ताचा एक प्रकार असून त्याचा वापर लोक अशा गोष्टींसाठी करत आहेत जे ते प्रत्यक्षात कधीच करू शकले नसते. एखाद्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओंचे मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचे स्वरूप आणि आवाज यांचे वास्तववादी मॉडेल तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग बनवली जाते. यालाच डीप सिंथेसिस तंत्रज्ञान म्हणतात. डीपफेक हे सखोल संश्लेषण तंत्रज्ञानातील सर्वात कुप्रसिद्ध प्रयोगांपैकी एक आहे. या तंत्रज्ञानाच्या गैरवापरचा सर्वात मोठा धोका महिलांना असून त्यांना लैंगिक वस्तूच्या रूपात डीपफेकच्या माध्यमातून सर्वात जास्त दाखवले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अश्लिल व्हिडिओ बनवले जातात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Tiger 3

Tiger 3 : चित्रपटगृहात फटाके फोडून चाहत्यांनी सलमानच्या टायगर 3 चे केले स्वागत

Posted by - November 13, 2023 0
राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा (Diwali) सण साजरा करण्यात येत आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने न्यायालयाने फटाके फोडण्याची वेळ ठरवून दिली…
Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनामध्ये उसळली गर्दी; Video आला समोर

Posted by - September 21, 2023 0
मुंबई : ‘लालबागचा राजा’ हा (Lalbaugcha Raja) कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी…
Viral Video

Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे

Posted by - January 14, 2024 0
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

Posted by - November 11, 2023 0
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन (Maharashtra Weather Update) झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.…
Waheeda Rehman

Waheeda Rehman : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Posted by - September 26, 2023 0
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *