VIDEO : सावधान..! QR कोड स्कॅन करताय ? QR कोड म्हणजे नेमकं काय ? कशी होते फसवणूक ? वाचा सविस्तर

248 0

डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार होत असले तरी धोक्‍याची घंटाही तितकीच मोठी आहे. थेट खात्यातून रक्कम जेव्हा जाते तेव्हा त्याची तीव्रता समजते. ऑनलाईन फसवणूक करणारे तुमचं बँक खातं रिकामं करण्यासाठी नेहमी वेगवेगळे पर्याय शोधत असतात. त्यातीलच एक म्हणजे क्यू आर कोड. होय. क्यू आर कोड द्वारे नेमकी कशी फसवणूक होते त्यापासून बचाव कसा करावा हे आज आपण पाहणार आहोत. पण त्या आधी क्यू आर कोड म्हणजे नेमकं काय जाणून घेऊया.

ब्लॅक कलरच्या चौकटीत एक वेगळ्याच प्रकारचा पॅटर्न असतो. क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर एक लिंक तयार होते. बार कोड प्रमाणेच प्रत्येक क्यूआर कोड थोडासा वेगळा असतो. बहुतांश वेळा तुम्ही दुकानांवर देवाण-घेवाणीसाठी पेटीएम किंवा इतर क्यूआर कोड पाहिले असतीलच. या क्यूआर कोडचा वापर करून सध्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. क्यूआर कोडचा वापर करून व्यवहारात वाढ होत असतानाच फसवणुकीचेही प्रकार मोठया प्रमाणात वाढत आहेत.

क्यू आर कोडचा वापर करून नेमकं कसं फसवलं जातं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर त्याबाबतही जाणून घ्या. मुळात प्रत्येक क्यूआर कोडच्या मागे एक URL लपलेला असतो. त्याद्वारे तुम्हाला एका साईटवर रिडायरेक्ट केलं जातं. साईटवर एखाद्या ठिकाणी क्लिक करायला सांगितलं जातं. असं केल्यामुळे तुमच्या बँक खात्यांची माहिती संबंधित व्यक्तीकडे पोहोचते. पैसे देण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात येतो. तुमच्याकडे असलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून पैसे देण्यात येतात. फसवणुकीच्या प्रकरणात तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुम्हाला पैसे मिळतील ,असं सांगितलं जातं. तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करताच तुमच्या खात्यातून पैसे कमी होतात.

अशा फसवणुकीपासून बचाव कसा करावा 

  • फोनच्या स्कॅनरचा वापर करून कोणताही क्यूआर कोड स्कॅन करू नका
  • पैसे देण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा लागत असल्यास पेटीएम, व्हाट्सअ‍ॅप, फोन पे किंवा भीम सारख्या अ‍ॅपचा वापर करा
  • तुम्हाला पैसे घेणाऱ्या व्यक्तीचं नाव दिसतं, तुम्हाला नावात संशय वाटल्यास पेमेंट करू नका
  • तुमच्या बँक खात्यातून पैसे कपात झाले असल्यास तात्काळ बँकेशी संपर्क करा
  • पोलिसात तक्रार दाखल करा. अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी एकाहून अधिक पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करू नका
  • पासवर्ड स्ट्राँग ठेवा आणि वेळच्यावेळी पासवर्ड बदला
  • फोनला कोड लॉक किंवा फेस लॉक करा
Share This News

Related Post

Pune Crime Video

Pune Crime Video : पुण्यातील खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Posted by - February 19, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime Video) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गाडी पार्क करण्याच्या किरकोळ झालेल्या वादातून तरुणाला…
Pune Ganpati

Pune Ganpati : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन; 9 तासांपेक्षा जास्तवेळ चालली मिरवणूक

Posted by - September 28, 2023 0
पुणे : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं (Pune Ganpati) विसर्जन पार पडलं आहे. गणपती विसर्जनाची ही मिरवणुक 9 तासांपेक्षा जास्त वेळ…

लिप्पन आर्टच्या कलाकृतींमधून तुमचं घर बनवा अधिक सुंदर

Posted by - June 20, 2022 0
आजकाल घर घेताना लोकेशनपासून तर सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने बघितली जाते. मग तो भिंतीचा कलर असो किंवा त्यावरची सजावट…
Onkar Bhojane Video

Onkar Bhojane Video: ‘नाही मोठेपणाचा आव रे..’, ओंकार भोजनेच्या नव्या कवितेने जिंकले मन

Posted by - July 29, 2023 0
अभिनेता ओंकार भोजने हा नेहमी आपल्या हटके कवितांसाठी (Onkar Bhojane Video) तसेच आपल्या भन्नाट कॉमेडीसाठी ओळखला जातो. तो महाराष्ट्राची हास्यजत्रा…
Viral Video

Viral Video : ड्रेनेज साफ ​​करताना कामगाराच्या अंगावरून गाडी गेल्याने कामगाराचा मृत्यू

Posted by - June 26, 2023 0
मुंबई :देशभरात ड्रेनेज लाईन साफ करतांना विषारी वायूमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मुंबईतील कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *