#Pune : तरुणाचे व्यायाम करून झाल्यानंतर फोनवर बोलत असताना दुर्दैवी निधन; मृत्यूचे कारणही आहे धक्कादायक ;नक्की जबाबदार कोण ?

1155 0

पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या युवकाचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

२१ वर्षीय अमोल शंकर नाकते हा इव्हेंट मॅनेजमेंटची काम करत होता. सोमवारी रात्री व्यायाम झाल्यानंतर फोनवर बोलत असताना अचानक अमोल खाली पडल्याचं पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि जवळच्या दवाखान्यामध्ये त्याला भरती केलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने पायाची बोटं काळी निळी झाल्याचं दिसलं. त्यामुळेच त्याचा मृत्यू देखील झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, अद्याप ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल आला नसल्याने अमोलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अधिकृत रित्या स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या वतीने जिथे ओपन जिम बांधण्यात आली आहे, तिथं महावितरणची वायर देखील गेली आहे. याच वायरने शॉक लागला असून मृत्यू झाला आहे, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.

त्यामुळे याबाबत पोलिसांनी अनोळखी व्यक्ती किंवा पालिका किंवा महावितरण यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असल्याचं अमोल नकाते यांनी केला आहे.

Share This News

Related Post

दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स संघांची विजयाची हॅट्रीक !!

Posted by - January 14, 2023 0
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित…
Cricket

Olympic Games : ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांनी पुन्हा क्रिकेटचा समावेश टी20 फॉरमॅटवर IOC कडून शिक्कामोर्तब

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (Olympic Games) क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आयओसीच्या 141 व्या अधिवेशनातील बैठकीत…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘निवडणूक होऊ द्या! एका एकाला कसा सरळ करतो’ अजित पवारांनी भरसभेत दिला दम

Posted by - May 8, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास…

कात्रज कोंढवा रस्त्यासाठी 140 कोटींचा निधी; रस्त्याच्या कामाला गती महानगरपालिकेवर अतिरिक्त खर्चाचा भार

Posted by - March 17, 2024 0
पुणे: कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची घोषणा अनेक दिवसांपूर्वी झाली होती. मात्र या कामासाठी भूसंपादनासाठी अनेक अडथळे निर्माण होत होते. मात्र…
Bilkis Bano Gangrape

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Posted by - January 8, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिलकिस बानो सामुहिक बलात्कार (Bilkis Bano Gangrape) प्रकरणातील दोषींसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दोषींना शिक्षेतून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *