युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव; उपप्रमुख, लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान

226 0

पुणे : कश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाकडून प्रशंसा प्रशिस्तीपत्रक देण्यात आले आहे. सैन्य दलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून पुनीत बालन हे देशभर सामाजिक काम करीत आहेत. प्रामुख्याने ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहा शाळा त्यांनी चालविन्यास घेतल्या असून सर्व आर्थिक मदत केली जात आहे.

या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या अतिरेक्यांचा सर्वांत जास्त धोका (हाय मिलेटिन्स) असलेल्या भागात या सर्व शाळा आहेत. याशिवाय बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कुलला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत केली जात आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविण्यासाठी पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते, यांत आफरीन हैदर (तायक्वांदो), सायकलपट्टू मोहोम्मद सलीम, उमर सय्यद (खो खो) अश्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच प्रजासत्ताक दिनी अतिरेक्यांचा सर्वात जास्त धोका असलेल्या शोपियान मध्ये सर्वांत 150 फुट उंचीचा तिरंगा ध्वजही उभारला आहे. कश्मीर खोऱ्याच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी त्यांच्या या भरीव कामगिरीची दखल घेऊन दिल्ली येथे भारतीय सैन्य दलाकडून उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी बालन यांना प्रशंसा प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय सैन्य दलासाठी मला काम करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्यच समजतो. सैन्य दलासमवेत नवीन कश्मीर घडविण्यासाठी जे काही करावे लागेल, ते निश्चितपणे मी करेल. हे काम करताना सैन्य दलाकडून मिळालेले प्रशस्तीपत्रक निश्चितपणे माझे मनोबल वाढविणारे आहे.

Share This News

Related Post

अजित पवारांच्या बालेकिल्लाला तडा! पुण्यातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शरद पवार गटात घरवापसी

Posted by - June 30, 2024 0
देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीए ला तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष…

MIT World Peace University : हवामानातील बदलांच्या परिणामांबद्दल लोकअदालतला चांगला प्रतिसाद

Posted by - October 4, 2022 0
पुणे : हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी…

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - December 13, 2022 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शरद पवार यांच्या ओक या निवासस्थानी अज्ञात…

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा हीच विनायक मेटेंना श्रद्धांजली; विनायक मेटेंच्या पत्नीची सरकारला विनंती

Posted by - August 22, 2022 0
मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं 14 ऑगस्ट रोजी पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण आपघात झाला असून…
Aarti Patil

Punit Balan : ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धे’त ‘पुनीत बालन ग्रुप’च्या आरती पाटीलने पटकावली 2 कांस्य पदके

Posted by - March 26, 2024 0
पुणे : ‘पुनीत बालन ग्रुप’ची पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या 6 व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *