MLA Bachchu Kadu : “आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना, मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू…!

214 0

अमरावती : पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. यापुढे काही कराल तर प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असा गर्भित इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना त्यांचे नाव न घेता दिला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राणा यांच्याबरोबरचा वाद संपुष्टात आल्याचं जाहीर केलं.

रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. कोणी काय म्हटलं हा विषय महत्त्वाचा आहे. कारण अस्तित्वाचा आहे. कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे काय आम्ही स्वस्त नाहीये. पहिली वेळ आहे माफ आहे. आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना… मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

आम्ही गांधीजींना मानतोय. पण भगतसिंह आमच्या एवढ्या डोक्यात आहे की आमची कधी सटकते ते माहीतच पडत नाही. त्यामुळे त्याचाही विचार करा. आम्हीही अपशब्द बोलणार नाही. आम्हीही आचार संहिता पाळू. कुणाचं मन दुखावेल असं कधी करणार नाही. केवळ सरकारमध्ये आहे म्हणून मंत्रिपदासाठी करतोय असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज सर्व पक्षात बंडखोर आहेत. जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंक्तीत आहेत. फेसबुकच्या कमेंटवर जाऊ नका. आजकाल अर्धा सोशल मीडिया पैशाने चालतो. खरी बाजू समोरच येत नाही. मला शेतकरी आंदोलनात मीडियाने एवढं चालवलं असतं तर शेतकऱ्यांच्या पाच सहा मागण्या पूर्ण केल्या असत्या, असा टोला त्यांनी मीडियाला लगावला आहे.

आंदोलन करणाऱ्यांनी आंदोलन करावं आणि सत्तेत असलेल्यांनी सत्ता उपभोगावी हा गेमच आम्हाला पलटवून टाकायचा आहे. आम्हाला 10 आमदार निवडून आणायचे आहेत. आमच्या इशाऱ्यावर सरकार चाललं पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

Share This News

Related Post

Maharashtra Map

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची नावे

Posted by - May 1, 2024 0
मुंबई : आज शिंदे गटाने तीन महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा (Maharashtra Politics) केल्याने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा…

मुलांनो अभ्यासाला लागा ! तिसरीपासून परीक्षा होणार पुन्हा सुरू ? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती , वाचा सविस्तर

Posted by - October 7, 2022 0
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे राज्यात आठवीपर्यंत परीक्षा आत्तापर्यंत तरी घेतली जात नव्हती.…

पतिपत्नीच्या नात्याला काळिमा ! पैशासाठी पत्नीला केले मित्रांच्या हवाली

Posted by - April 4, 2023 0
पैशासाठी पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उघडकीस आली आहे. या…
LokSabha

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : एक दोन नव्हे तर तब्बल 38 उमेदवार बारामतीच्या रिंगणात

Posted by - April 23, 2024 0
बारामती : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून बारामती लोकसभा निवडणुकीच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष वेधून आहे. या बारामती…

बांधकाम परवाने देणारी BPMS वेबसाईट ६ दिवसांपासून बंद

Posted by - December 27, 2022 0
राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानगीसाठी महाआयटीने तयार केलेली बीपीएमएस (BPMS) ही ऑनलाइन सिस्टीम गेल्या सहा दिवसांपासून बंद पडली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *