विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

181 0

नवी दिल्ली- आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला काँग्रेस नेते जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स), एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव उपस्थित होते.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, ‘यशवंत सिन्हा यांचा प्रचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.’ काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ‘लोकशाहीचे रक्षण करु शकेल, असा उमेदवार आम्ही दिला आहे.’

यशवंत सिन्हा 27 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील असे मानले जात आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या मागील बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही मांडला होता, मात्र पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवार होण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतीपदासाठी गोपाळ कृष्ण गांधी यांचेही नाव पुढे आले होते.

दुसरीकडे, आज केंद्रातील भाजपनेही बैठक बोलावली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात भाजपने आज संध्याकाळी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मंथन सभा असे नाव देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित राहू शकतात. यापूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर उमेदवाराच्या नावावर एकमत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणीची तारीख 21 जुलै निश्चित करण्यात आली आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे.

Share This News

Related Post

Sanjay Kakde

Sanjay Kakde : भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ; शेअर इक्विटी बुडविल्याप्रकरणी 5 गाड्या जप्त तर कंपनीचे समभाग विक्रीचे कोर्टाकडून आदेश

Posted by - July 15, 2023 0
पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीने 786…

महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

Posted by - September 28, 2022 0
पुणे : राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या…

“ही बैठक नव्हती”…! शिवसेना बैठकीमध्ये खासदारांच्या अनुपस्थितीबाबत आ.अंबादास दानवे यांचे स्पष्टीकरण

Posted by - July 11, 2022 0
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या लोकसभा खासदार आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. या…

चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याला प्राधान्य – उद्योगमंत्री उदय सामंत

Posted by - October 19, 2022 0
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण…

नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर पोलीस महासंचालकांना दिल्लीत हजर होण्याचे आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई – खासदार नवनीत राणा यांना अटक करण्याची कारवाई मुंबई पोलिसांच्या अंगाशी येणार आहे अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. नवनीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *