#MUMBAI : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे कर्तृत्वान महिलांना ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’; खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा

441 0

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली.

या पुरस्कारांसाठी आजपासूनच म्हणजे १८ मार्च पासून अर्ज मागविण्यास सुरु झाले असून अंतिम मुदत ३० एप्रिल २०२३ ही असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असून पुरस्कारार्थीची घोषणा जून मध्ये करण्यात येणार आहे. देशाला पथदर्शी ठरलेले महिला धोरण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या दिवशी म्हणजे २२ जून रोजी हे पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रासाठी ‘यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार’ या नावाने दिला जाणार असून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकरी महिलेची निवड करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार ‘यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार’ या नावाने ओळखला जाईल. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येईल. तर औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. याबरोबरच पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारास ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

या पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८११४९३९६ या मोबाईल क्रमांकावर किंवा women@chavancentre.org या इमेलवर संपर्क साधावा.

Share This News

Related Post

घरगुती भांडणातून सासूने असा घातला वर्मी घाव; सुनेचा जागीच मृत्यू, नंतर असा लपवायचा केला प्रयत्न

Posted by - March 8, 2023 0
पुणे : घरगुती भांडणातून सासूने सुनेला केलेल्या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

Posted by - August 15, 2022 0
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी साडेसात वाजता लाल किल्ला नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे.…

धनंजय मुंडे यांना यांना हार्टअटॅक नाही, अजितदादांनी केले स्पष्ट

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आली त्यामुळे शुद्ध हरपली. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी खोटी असल्याचे…

‘तो आवाज माझाच होता’, फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंचा मोठा दावा

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- कथित फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज चौकशी झाली. त्यामध्ये नाना पटोले यांनी सांगितले की राजकीय…
Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

Posted by - March 19, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *