पुणे : जागतिक मानसिक आरोग्य दिवस जनजागृतीसाठी पदयात्रा

408 0

पुणे : मानसिक आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी गरजेचे आहे. जसे शारीरिकरीत्या तंदुरुस्त असणे गरजेचे असते तसेच मानसिकरित्याही फिट असले पाहिजे तेव्हाच व्यक्तीला निरोगी म्हटले जाते. हाच उद्देश लक्षात घेता नित्यानंद रिहॅबलेटेशन मेंटल हेल्थ केअर सेंटर पाचणे व कात्रज पुणे येथे नित्यानंदचे संस्थापक डॉक्टर नितीन दलाया यांच्या पुढाकाराने कात्रज प्राणी संग्रहालयापासून बालाजी नगर ते त्रिमूर्ती चौक भारती विद्यापीठ परिसरात तसेच हिंजेवाडी येथील लक्ष्मी चौक ते पुना बेकरी पदयात्रा कडून घोषणा देण्यात आल्या तसेच पथनाट्य सादरिकरणातून जनजागृती करण्यात आली. यावेळी नित्यानंदचे संस्थापक नितीन दलाया, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उषा गोखले, व्यवस्थापक दयानंद कांबळे, सर्व कर्मचारी वर्ग व उपचारस्थ रुग्ण पदयात्रेत सहभागी होते.

डॉक्टर नितीन दलया हे एमडी मनोविकारतज्ञ असून 1997 पासून मनसोपचार क्षेत्रात कार्य करत आहेत. २००२ पासून नित्यानंद रिहॅबिटेशन अँड सिडेन्शनाल मेंटल हेल्थ केअर सेंटर, नित्यानंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व मनसोपचार व्यसनमुक्ती मनोसामाजिक पुनर्वसन केंद्र अविरतपणे आपली सेवा देत आहे. आजतागायत या केंद्राच्या माध्यमातून ५० ते ५५ हजार हून अधिक रुग्णांना यशस्वीरित्या उपचार देऊन बरे करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिली.

जागतिक मानसिक आरोग्य दिवस सप्ताह अंतर्गत पदयात्रा, पथनाट्ये सादरिकरना सोबतच शनिवार दिनांक ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी एक दिवशीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून या चर्चा सत्रात रुग्णांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच सोमवार दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ रोजी सर्व रुग्णांसाठी स्पोर्ट्स कॉम्पिटिशन चे आयोजन देखील करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस; भरीव तरतुदींसह मुख्यमंत्र्यांनी काय केल्या महत्वाच्या घोषणा, वाचा सविस्तर

Posted by - December 29, 2022 0
नागपूर : विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगतांना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार…

कृरतेचा कळस : जन्मदात्यानचं दोन दिवसाच्या लेकराला जमिनीवर फेकलं, नागपुरातील धक्कादायक घटना !

Posted by - January 2, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होते आहे. या बापाच्या मानगुटीवर बसलेल्या संशयाच्या भूतान आपल्या पोटाच्या दोन…

मनोरंजन क्षेत्रावर शोककळा; अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Posted by - August 9, 2022 0
मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले…
Aadhar

आनंदाची बातमी ! फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अपडेट

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या सुविधेमध्ये वाढ केली आहे. UIDAI द्वारे जारी केले जाणारे हे डॉक्यूमेंट…

पुण्याची हवा प्रदूषित ! हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीत

Posted by - December 12, 2022 0
पुणे : ‘चांगल्या हवेचे शहर’ अशी काही वर्षांपूर्वी असलेली पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे.पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदवण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *