महिलांना आवडत नाहीत पुरुषांमधील ‘या’ सवयी ; नात्यामध्ये सतत येत असेल कडवटपणा तर हा लेख नक्की वाचा

824 0

आज मोठ्या प्रमाणावर पती-पत्नीच्या नात्यांमध्ये होणारी ताटातूट असो किंवा अगदी नवख्या प्रेमामध्ये देखील सहज एकमेकांमध्ये येणारे अंतर असो . पुरुषांमधल्या या काही सवयी आहेत. ज्या महिलांना कधीही आवडत नाहीत आणि त्यामुळे आजपर्यंत अनेक वेळा डिव्होर्स पर्यंत देखील प्रकरण पोहोचते आहे.

आता तुम्हाला वाटत असेल की एखाद्या दुसऱ्या सवयीमुळे डिव्होर्स कसा होऊ शकतो? तर हे तितकंही सोपे नसते. एकमेकांसोबत राहायचं तर एकमेकांच्या सवयी देखील एक्सेप्ट करणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच काही विक्षिप्त सवयी मध्ये बदल करणं देखील नात्यांसाठी महत्त्वाच असतं. म्हणूनच खास आजचा हा लेख नक्की वाचा.

तुम्ही जर घरातल्या स्त्रीला तुमच्यापेक्षा कमी लेखत असाल तर ते लगेच थांबवा. कदाचित तुमची पत्नी, आई, बहीण ही तुमच्यापेक्षा कमी शिकलेली आणि कमी कमावती असेन देखील पण कुठलीही स्त्री पुरुषापेक्षा कमी नसते. आपल्या पत्नीसमोर तिचा आणि कोणत्याही दुसऱ्या स्त्रीचा अपमान करू नका. तिला कमी लेखणे लगेच बंद करा.

आळस हा पुरुषांचा सर्वात मोठा शत्रू आहे. अर्थात आळस हा स्त्रीमध्ये नसतो असं काहीही नाही. पण आजही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांचा राजेशाही थाट हा स्त्रियांना नेहमी त्यांचा आळसच वाटत असतो. तापटीप राहणे ,स्वच्छ राहणे आणि स्वच्छता ठेवणे या सवयी स्वतःला लावून घ्या. याचा अनुभव तुम्हाला कदाचित आला असेल , दिवसभर घर टापटीप ठेवण्यासाठी राबणारी तुमची पत्नी तुमच्या लहान लहान गोष्टीमुळे त्रासते, जसे की पेपर वाचल्यानंतर आहे तिथे टाकून देणे, टॉवेल वापरल्यानंतर वाळत न घालणे, जेवणानंतर ताटात हात धुणे आणि ताट तिथेच सोडून उठून निघून जाणे, धुण्याचे कपडे कुठेही टाकून देणे या काही किरकोळ सवयी आहेत ज्यामुळे घरात विनाकारण कुरबुरी वाढतात. त्यामुळे स्वतःची कामे स्वतः करायला शिका. त्यामुळे तुमची पत्नी तुमच्या कामांमध्ये स्वतःहून तुम्हाला मदत करायला सुरुवात करेल.

आठवडाभर बाहेर काम केल्यानंतर तुम्हाला एक दिवस घरात आराम करावा वाटतो. यात गैर नाही पण तसेच आठवडाभर घरात काम केल्यानंतर पत्नीलाही घराबाहेर पडून दिवस वेगळा घालवावासा वाटतो. अशावेळी दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन आठवड्यातला एक दिवस तरी घराबाहेर छान व्यतीत करा आणि त्याच दिवसात आरामासाठी देखील वेळ काढा.

आज प्रत्येक स्त्री जशी घराला हातभार लावण्यासाठी आज काही ना काही कमवण्याची धडपड करत असते तसेच आठवड्यातून एखाद्या वेळी तिला स्वयंपाकात लहान-मोठी मदत करा. तुमच्या नात्यात नक्की गोडवा वाढेल.

सोपे आहे प्रत्येक स्त्रीला मानसन्मान देणारा, नीटनेटका राहणारा पुरुष आवडत असतो. त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये जर सातत्याने कडूपणा येत असेल तर या काही गोष्टी अवश्य करून पहा

Share This News

Related Post

पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना किती खोके मिळाले होते ? प्रकरणाला आता वेगळे वळण ,वाचा विजय शिवतारे काय म्हणाले…

Posted by - November 8, 2022 0
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अवमानकारक शिवीगाळ केल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांना विरोधी पक्षच नाही तर स्व-पक्षातून देखील…
manoj-jarange-patil

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला अखेर यश (Maratha Reservation) आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य…

रात्री शांत झोप लागत नाही ? ‘या’ सहज सोप्या उपायांमुळे नक्की फरक जाणवेल

Posted by - October 8, 2022 0
रात्री शांत झोप न लागणे हा आजच्या जगामधला सर्वात सामान्य त्रास आहे. पण तो जितका सामान्य त्रास आहे, तितकाच घातक…
Corona News

Corona News : कोरोना परत आला ! ‘या’ जिल्ह्यात आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

Posted by - September 25, 2023 0
सांगली : 2-3 वर्षांपूर्वी कोरोनाने (Corona News) महाराष्ट्रासह संपूर्ण जगात थैमान घातले होते. त्यामुळे लोकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.…

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

Posted by - February 22, 2023 0
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *