व्यक्तिगत हेवे – दावे काढण्याच्या हेतूने, ‘माध्यमां समोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणाऱ्यांवर’ काँग्रेस पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करावी – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

517 0

पुणे : राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय – अस्तित्वा साठी सत्यजित तांबे व मा हंडोरे प्रकरणीचे निमित्ताने व्यक्तिगत हेवे-दावे काढण्या करीता पुढे सरसावली असून, ‘माध्यमां समोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढुन, पक्षाचीच बदनामी करत आहेत’ त्यामुळे त्यांचेवर प्रथम पक्षश्रेष्ठींनी त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!

माध्यमांसमोर न जाता ही त्यांना आपली बाजू पक्षाध्यक्षां समोर मांडता आली असती, मात्र एकीकडे सर्व विचारांती पक्षाध्यक्ष श्री खरगेजी यांनी ‘सत्यजित तांबे प्रकरणी शिस्तभंग समितीचा निर्णय’ जाहीर केला असतां, पुन्हा पक्षाध्यक्षांच्या निर्णयावरच् एक प्रकारे आक्षेप घेणे हा कोणता प्रकार आहे..(?) पक्ष-विरोधी भुमिकेतुन, पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणे हेच पक्ष विरोघी कृत्य असुन, याची गंभीर दखल घेऊन माध्यमां समोर आरोप करणाऱ्यांवरच(माजी आमदार देशमुख) पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करणेच गरजेचे आहे.

आरोप करणारे नेते, राज्यात तब्बल १६ दिवस मा राहुल गांधीजींची भारत जोडो यात्र चाललेली असतांना फारसे कुठेच दिसले नाहीत. मा चंद्रकांत हंडोरे पराभव प्रकरणी त्याच् वेळी केंद्रीय निरीक्षक येऊन चौकशी करून तत्कालीन अध्यक्षा मा सोनियाजीं कडे अहवाल सोपवला आहे.. या प्रकरणी माजी आमदार देशमुख वेगळे काय सांगत आहेत.. महाराष्ट्रासह इतर ही प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्त्यांची (प्रोसीजर) प्रक्रीया चालू आहे.. असे असतांना माध्यमांसमोक पक्ष ५ व्या क्रमांकावर जाईल अशी पक्षास खच्ची करणारी निंदनीय वक्तव्ये करण्यात कोणती धन्यता मानीत आहेत.,(?) असा सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा यांनी केला…!

राज्यात प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्र्या सह, सर्व नेते मा राहुजींच्या पदयात्रेसाठी व जाहीर सभांसाठी मार्गावरील जिल्ह्यांमध्ये जाऊन झटत होते. पक्षाध्यक्ष व इतर ही नेते सतत राहुलजीं सोबत चालत होते, पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी घालत होते. व त्यामुळे ‘राज्यात काँग्रेस पक्षास पोषक झालेले वातावरण’ काही नेते स्वअस्तित्वासाठी, अहंभाव व संकुचित हेतुने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते राज्यातील काँग्रेसजन खपवुन घेणार नाहीत असा संतप्त ईशारा देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला..व पक्षश्रेष्टींनी पक्षाची लक्तरे माध्यमांसमोर टांगणाऱ्यांवर त्वरीत शिस्त भंगाची कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : आईसोबतचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीदरम्यान 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुण्यासह (Pune News) पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त अनेक ठिकाणी उत्साहाला उधाण आलं होतं. बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात येत…

उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले

Posted by - March 18, 2022 0
राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशि,…

#PUNE : धंगेकर यांचे काम आणि महाविकास आघाडीची एकत्रित ताकद यामुळे विजय निश्चित- जयंत पाटील

Posted by - February 20, 2023 0
पुणे : जनसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम भाजपा करीत असून जनतेवर दहशत निर्माण करुन लोकशाही धोक्यात आणली जात आहे. माध्यमांची मुस्कटदाबी,…

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - August 4, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…
Pune News

Prithviraj Chavan : संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण

Posted by - May 8, 2024 0
पुणे : ” नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून , काँग्रेस पक्ष हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *