महत्वाची माहिती : बेरोजगारांना केंद्र सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये? केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

382 0

नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊननंतर भारतामध्ये बेरोजगीचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाकाळात देखील अनेक तरुणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात आता सायबर क्राईमचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे नोकरी विषयक किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणा-या कोणत्याही पोस्टवर शहानिशा न करता विश्वास थू नये असे केंद्र सरकारने घोषित केले आहे.

व्हॅट्सऍपवरून व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने’अंतर्गत बेरोजगार तरुणांना सरकारकडून दरमहा 6,000 रुपये भत्ता दिला जात आहे. असा कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल तर काळजी घेण्याची गरज आहे. याबाबतची माहिती सरकारने ट्विट करून दिली आहे.

पीआयबीने अधिकृत ट्विटर (Twitter) अकाउंटवर फॅक्ट चेकद्वारे माहिती दिली आहे. पीआयबीच्या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, अशी कोणतीही योजना सरकार चालवत नाही.

ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, हा मेसेज खोटा आहे आणि भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही. यासोबतच असे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहनही पीआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.

तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर तुम्ही PIB द्वारे ते तपासून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही यासंबंधीची माहिती व्हॉट्सअॅप क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकता.

Share This News

Related Post

… अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करू, वसंत मोरे यांनी कुणाला दिला इशारा ?

Posted by - April 1, 2023 0
‘आमचे साहेब परप्रांतीयांविषयी बरोबरच बोलतात. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सगळ्या परप्रांतीयांचं नाव खराब करतात. म्हणून आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागते.…
2000

2 हजारांची नोट चलनातून बाहेर, आरबीआयचा मोठा निर्णय

Posted by - May 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने…
Rape

लग्नापूर्वीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीचे महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Posted by - May 21, 2023 0
राहुरी : देवळाली प्रवरा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने एका गावात घरात घुसून 21 वर्षीय विवाहितेवर…

मोठी बातमी! कसबा विधानसभेची पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार; लवकरच उमेदवारही करणार जाहीर

Posted by - January 22, 2023 0
भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर असून 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार…

अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे …! डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

Posted by - October 6, 2022 0
माननीय श्री. उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र. काल विजयादशमी झाली. या नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस सारा महाराष्ट्र आदिशक्तीचा जागर करीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *