संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

512 0

मुंबई : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक पहा : 

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही- वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असेही सचिव श्री. भांगे यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

पुणे तिथे गुन्हेगारही नाहीत उणे ! जेएम रोडवर महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी देणारे चौघं गजाआड; दोन आरोपी अल्पवयीन !

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढले. सर्रास रहदारीच्या रस्त्यांवर कोयते हॉकी स्टिक घेऊन, गुन्हेगार दहशत माजवण्याचा प्रयत्न…

काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; सर गंगाराम रुग्णालयात उपचारार्थ दाखल

Posted by - March 3, 2023 0
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. जानेवारी महिन्यातच त्यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे आठ…

संजय राऊतांची अवस्था स्क्रिझोफ्रेनिया झालेल्या रूग्णासारखी; विजय शिवतारे यांची टीका

Posted by - July 16, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून ही माहिती…

पुणे : विजय दिवसाच्या स्मरणार्थ ‘सदर्न कमांड विजय रन’ चे आयोजन

Posted by - December 17, 2022 0
पुणे : 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त, सात राज्यांमध्ये पसरलेल्या भारतीय सैन्याच्या सदर्न कमांड…

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे पालिकेच्या पहिल्या रक्तपेढीचे लोकार्पण

Posted by - March 12, 2022 0
पुणे- महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *