#PUNE : खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट

545 0

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन केले. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, गौरव बापट व इतर पदाधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे उपस्थित होते.

यावेळी बोलताना बापट यांनी सांगितले की पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे सध्या या स्टेशनवर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलीस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण असाच वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील खडकी, शिवाजीनगर, हडपसर ही रेल्वे स्थानके विकसित करून या स्थानकावरून नवीन पर्यायी रेल्वे सेवा सुरु कराव्यात अशी माझी सातत्याने आग्रहाची मागणी होती.

यासंदर्भात मी संसदेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे फलाटाचे रुंदीकरण व नवीन लोकल रेल्वे सेवेचे आज उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे. शिवाजीनगर स्टेशन वरून तळेगाव-लोणावळा लोकल सेवा सुरु करण्यात आली असून येत्या काही दिवसात अजून ४ नवीन रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहेत. तसेच स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्म निवारा, टॉयलेट ब्लॉक, लाइटिंग, पंखे, FOB, वॉटर कुलर, घड्याळ, डस्टबिन, PAS, ट्रेन इंडिकेटर बोर्ड व इतर सुविधेसह प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

राज्यात ‘या’ दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची हवामान विभागाने वर्तवली शक्यता

Posted by - April 19, 2022 0
दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. भारतीय हवामान विभागाने सोमवारी…

काय अजित पवार कसं वाटलं जबरदस्तीनं आरती करताना ? निलेश राणेंचा खोचक टोला

Posted by - April 17, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Posted by - March 24, 2022 0
पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…

#PUNE : आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

Posted by - February 24, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता…

पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *