ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

203 0

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती. मात्र आमच्या सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत.

आम्ही महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर संपावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत म्हणजे त्यांना मदत करता येईल.

दरम्यान मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोन ऐवजी तीन हेक्टरअशी वाढीव आहे.

या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. लवकर याबाबत विहित नमून्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत या शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली. ऑक्टोबर 2022 मधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

DRDO

Pradeep Kurulkar : कुरुलकर चक्क गेस्ट हाऊसमध्ये भेटायचा महिलांना; तपासात आले समोर

Posted by - May 12, 2023 0
पुणे : डीआरडीओचे (DRDO) संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हनीट्रॅपमध्ये (Honey…
Suicide

मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात बेभान होऊन नाचला; यानंतर घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 5, 2023 0
जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी कढोली या भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतमजुराने राहत्या घरी विषारी…

“कैदी हे माणूस आहे त्यांना जनावरासारखी वागणूक देऊ नका !”, कैद्यांचे नातेवाईक आक्रमक; पुण्यातील येरवडा कारागृहाबाहेरील आंदोलन 

Posted by - January 2, 2023 0
पुणे : पुण्यातील येरवडा कारागृह बाहेर आज येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केल आहे. कारागृहातील कैद्यांना जनावरासारखी वागणूक देऊ नका,…
Manjushri Oak

कौतुकास्पद ! पुण्याच्या मंजुश्री ओकची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद; काय आहे रेकॉर्ड ?

Posted by - June 3, 2023 0
पुणे : गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी देशातील विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी भारतातील 121 भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कसा घ्यावा लाभ, जाणून घ्या

Posted by - February 4, 2022 0
नवीन वर्षात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *