वादग्रस्त वक्तव्यांनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवणार ? दिल्ली दौऱ्याकडे लक्ष

199 0

नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आतापर्यंत अनेक वेळा वादंग निर्माण झाले आहेत. पण नुकताच त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्रमध्ये वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे भाजप नेते देखील अडचणीत आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला भगतसिंह कोश्यारी यांना दिल्लीतून बोलवणे आल्याचे समजते सातत्याने भगसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आता या दिल्ली दौऱ्यामध्ये भगतसिंह कोश्यारी यांची नेमकी कोणाशी भेट होते आणि त्यानंतर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान एकंदरीत दबाव पाहता भगसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती देखील समजते आहे.

काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी ?
भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डि.लीट पदवी प्रधान सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक विधान केले. ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला विचारत होते. तुमचा आवडता हिरो कोण आहे? त्यावेळी आम्ही सुभाष चंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत होते त्यांचं नाव सांगत होतो. पण आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील. शिवाजी तर जुने आदर्श झाले आहेत. नवीन काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत हिरो इथेच मिळतील. असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते.

Share This News

Related Post

ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बालगंधर्व मंदीर येथे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या पार्थिवावर…

BREAKING : इंदोरहून पुण्याला येणाऱ्या बसचा भीषण अपघात ; 12 प्रवाशांचा मृत्यू

Posted by - July 18, 2022 0
इंदोर; मध्य प्रदेश : मध्यप्रदेश मधील इंदोर मधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मध्य प्रदेश मधील धार जिल्ह्यात इंदोर…
Vishnu Deo Sai

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Posted by - December 10, 2023 0
छत्तीसगड : वृत्तसंस्था – भाजपने छत्तीसगडच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून आपली सत्ता मिळवली होती. त्यानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी…

पुणे मेट्रोमध्ये अभियंत्यांना नोकरीची संधी, जाणून घ्या सर्व माहिती

Posted by - March 2, 2022 0
पुणे- येत्या 6 तारखेपासून पुणे मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचवेळी…

Decision of Cabinet meeting : लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करणार

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *