National Constitution Day

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

1928 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज देशभरात राष्ट्रीय संविधान दिवस (National Constitution Day) साजरा केला जात आहे. मात्र हा संविधान दिवस आजच का साजरा केला जातो? हे आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय घटनेत नमूद केलेले कायदे, हक्क आणि अधिकार आणि तत्त्वांचं पालन भारतीय नागरिक करतात ती राज्यघटना सर्व प्रथम 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं स्वीकारली.त्यामुळे 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय राज्यघटना दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो.

26 नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली त्यामुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मात्र 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संसदेने संविधानाचा स्वीकार केला त्यामुळे तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. हे संविधान लागू झाल्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट 1935 हा कायदा संपुष्टात आला. भारतीय संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर साजरा करण्याचा निर्णय सन 2015 मध्ये अंमलात आणला गेला. केंद्र सरकारने नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यानुसार सामाजिक न्याय मंत्रालयाने आदेश काढला होता.

राज्यघटनेत नमूद केलेल्या देशाच्या लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांची आठवण हा दिवस आपल्याला करून देतो.पृथ्वीवरील लिखित स्वरूपातील सर्वांत मोठी राज्यघटना असा या घटनेचा गौरव केला जातो. भारतीय राज्य घटनेला एक सुंदर कलाकृतीच समजलं जातं आणि ही कलाकृती घडवणाऱ्या संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मोरया गोसावी मंदीर देवस्थाननं ‘तो’ फलक हटवला

Posted by - August 19, 2023 0
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वकिलामार्फत चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिर…
Kolhapur Crime

मधुमेहाच्या औषधाने केला घात? बायकोने किचनमध्ये तर पतीने भररस्त्यात सोडले प्राण

Posted by - May 31, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध पती- पत्नीच्या जीवावर बेतले आहे. हे दाम्पत्य…
Chitra-Wagh-Supriya-Sule

तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटेल; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Posted by - June 8, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी वायरल झालेल्या मंचर प्रकरणातील घटनेटवरून राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत.…

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे 2023 साठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तारीख

Posted by - September 20, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या मार्च 2023 साठीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात…
Poster

Poster : राज आणि उद्धव एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड करून विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *