युपी पोलिसांनी ढेर केलेला असद अहमद कोण होता ? काय आहे याचा पूर्वइतिहास ?

2307 0

उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. झाशी येथे झालेल्या चकमकीत या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. युपी पोलिसांनी ढेर केलेला असद अहमद कोण होता ?

अतिक अहमद मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

वास्तविक असद अहमद या तरुणावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. मात्र असदने 24 फेब्रुवारी २०२३ रोजी प्रयागराजमधील भररस्त्यात अर्धा डझन शूटर्ससह उमेश पाल यांची हत्या केली होती. असद हा गुंडगिरीतून राजकारणात प्रवेश केलेल्या गँगस्टर अतिक अहमद यांचा तिसरा मुलगा होता. असद लखनऊ येथून एका चांगल्या शाळेतून 12 वी उत्तीर्ण झाला होता. तिथूनच तो आपली टोळी चालवत असे

त्याच्या कुटुंबाच्या गुन्हेगारी रेकॉर्डमुळे असद पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकला नाही, कारण त्याला पासपोर्ट मिळू शकला नाही. उमेश पालची हत्या होईपर्यंत असद पोलिसांच्या रेकॉर्डवर नव्हता. मात्र हत्येच्या वेळी सीसी टीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यामुळे तो पोलिसांच्या नजरेत आला. असद यांच्या डोक्यावर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा सर्वाधिक ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. असदचे वडील अतिक अहमद हे गुजरातमधील साबरमती तुरुंगात, तर काका अश्रफ हे उत्तर प्रदेशातील बरेली तुरुंगात आहेत. त्याच्या अनुपस्थितीत अतिकची दोन मोठी मुले उमर आणि अली गेल्या काही वर्षांपासून ही दहशतवादी टोळी चालवत होते.

तपास यंत्रणांनी आतिक अहमदच्या दोन्ही मोठ्या मुलांवर बक्षीस जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये दोन्ही भावांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. पोलीस चकमकीत त्यांचा खात्मा करतील अशी भीती त्यांना वाटत होती. यानंतर असदने टोळीची सूत्रे हाती घेतली. आतिकला आणखी दोन लहान मुले आहेत, आझम आणि आबान, ते अनुक्रमे १०वी आणि आठवीत शिकतात. आझम आणि अबान यांना सध्या बाल केंद्रात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, उमेश पालची हत्या केल्यानंतर त्यांना ते निराधारपणे भटकताना आढळले, तर त्यांची आई शाइस्ता परवीन यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला की, पोलिसांनी मुलांना त्यांच्या घरातून नेले आहे. उमेश पाल हत्याकांडातील परवीनही आरोपी असून ती फरार आहे.

अतिक अहमद ढसाढसा रडला

आज माफिया अतिक अहमद याला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्या मुलाचा एन्काउंटर झाल्याचे सांगण्यात आले. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक अहमद कोर्टातच ढसाढसा रडला.

Share This News

Related Post

सांगली, सोलापूर पाठोपाठ नांदेडच्या सहा तालुक्यांना नकोसा झाला महाराष्ट्र !

Posted by - December 2, 2022 0
नांदेड : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या महाराष्ट्र-कर्नाटक वादातील वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न पेटला असताना आता नांदेड जिल्ह्यातल्या सहा…
Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान लोखंडी भाग कारच्या बोनेटवर पडून भीषण अपघात

Posted by - August 11, 2023 0
पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) स्टेशनचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना काल येरवडा या ठिकाणी एक भीषण दुर्घटना घडली…

तुम्हाला माहित आहे का ? देवाचे तीर्थ प्राशन केल्यानंतर डोळ्याला आणि मस्तकाला का लावले जाते

Posted by - December 2, 2022 0
आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर अनेक वेळा हातामध्ये तीर्थ घेतो कित्येक जणांनी केवळ आपल्या वडीलधाऱ्यांचे पाहून हातात तीर्थ घेतल्यानंतर ते प्राशन करून…
New Rules from 1st October

New Rules from 1st October : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल; तुमच्या खिशाला लागणार कात्री

Posted by - September 30, 2023 0
मुंबई : प्रत्येक महिन्याची एक तारीख खास असते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून (New Rules from 1st October) नवीन नियम लागू…
Accident News

Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 13, 2024 0
अहमदनगर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. पॅगो रिक्षा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *