MAHARASHTRA POLITICS : शिवसेना आणि शिवसेनेच निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं ? सुनावणी पुढच्या वर्षी

205 0

शिवसेना नेमकी कुणाची आणि शिवसेना हे पक्ष चिन्ह नक्की कुणाचं याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी घेण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हा वाद निर्माण झाला होता. दरम्यान निवडणूक आयोगानं दोन्हीही गटांना कागदपत्र सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दोन्हीही गटांकडून कागदपत्रे सादर करण्यात आली असून निवडणूक आयोगाने सुनावणीला सुरुवात केली. विशेष म्हणजे यावेळी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते. तथापि शिंदे गटाकडून कोणतेही प्रतिनिधी मात्र उपस्थित नव्हते.

दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये कोणताही युक्तिवाद झालेला नाही. असे स्पष्टीकरण अनिल देसाई यांनी दिले. केंद्रीय आयोगासमोर सुनावणी सुरू होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयोग आयुक्तांनी काही महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश झोत टाकला. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर जमा झालेल्या कागदपत्रांची छाननी महत्त्वाची असून दोन्ही बाजूच्या पक्षांचे यासंदर्भात अर्ज आले आहेत यावर मुख्य सुनावणी सुरू करायची की बाजूने ज्या गोष्टी येत आहेत यावर अधिक माहिती घ्यायची याबाबत दोन्हीही गटांशी चर्चा करून मुख्य सुनावणी जानेवारीमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलो आहे.

ठाकरे गटाकडून तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. आणि बाकीचे आमचे प्राथमिक सदस्यांची नोंद आहेत. असे यावेळी अनिल देसाई यांनी सांगितले त्यामुळे, आता पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे.

Share This News

Related Post

साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे – नितीन गडकरी (व्हिडीओ)

Posted by - June 4, 2022 0
पुणे- साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व…

महाराष्ट्राचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी माध्यमांनी जबाबदारीने काम करावे-अजित पवार

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असून माध्यमांनी राज्याचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित…
Pune News

Pune News : पुण्यात दहशतवादी-पोलीस यांच्यातील झटापटीचा थरारक VIDEO आला समोर

Posted by - August 4, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी स्वतःच्या जीवावर उदार होत दहशवाद्यांना पकडले होते. हे दहशतवादी पुण्यात मोठा घातपात करण्याच्या तयारीत…

दादरा व नगर हवेली मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित भव्य स्वतंत्रता स्मारक सिल्वासा येथे बनणार ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय (व्हिडिओ)

Posted by - March 21, 2022 0
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे कर्तव्य केंद्र सरकार विविध उपक्रमांच्या माध्यमातून बजावते…

मोठी बातमी : मलकापुरात काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात सव्वा दोन वर्ष वीज चोरी; 10 लाख 47 हजाराचा दंड वसूल

Posted by - March 27, 2023 0
मलकापूर : मलकापुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस नेत्याच्या रुग्णालयात आणि घरात तब्बल सव्वा दोन वर्ष वीज चोरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *