#Mental Health : जेव्हा उगाचच निराश वाटतं ! फक्त ‘हे’ हलकेफुलके बदल करून पहा, स्वतःची किंमत करायला शिकाल…

701 0

बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण एकटे आहोत, उगाचच निराश झाल्यासारखं वाटतं, आजूबाजूच सगळं वातावरण भकास वाटायला लागतं, जर तुम्हालाही असं कधी वाटत असेल तर फक्त हे हलकेफुलके बदल करून पहा…

१. जर तुम्ही नोकरी करत आहात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण ऑफिस फक्त तुमच्या कामामुळे चालतय हा विचार मनातून काढून टाका. कारण असं काहीही नसतं. सरळ दोन दिवस सुट्टी टाका.

२. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्या कोणत्याही काम न केल्याने घराला काहीही फरक पडत नाही. आज सरळ सरळ घरामध्ये सांगून मोकळे व्हा की तुम्ही कोणतंही काम करणार नाही, कोणाचं काहीही थांबणार नाही हे लक्षात घ्या.

३. तुमच्या व्हाट्सअपचा डीपी बदला. तुमचा एखादा स्पेशल छान हसताना असा डीपी लावा. जो बघून पहिले तर तुम्हाला छान वाटेल.

४. तुमचं वॉर्डरोब फिल्टर करा. म्हणजे काय तर तेच तेच कपडे बाहेर काढा, तुम्हाला न आवडणारे कपडे बाहेर काढा, वॉर्डरोब जमेल तसं मोकळ करा. आणि हो शॉपिंग करायला विसरू नका. या सगळ्या गोष्टींना अर्थात पैसे लागणार आहेत त्यामुळे खिशाचा अंदाज घ्या. आणि मग शॉपिंग करा. तुम्ही अगदी एखादा जरी ड्रेस नवीन आणलात आणि तो घातला तरी तुमचा मूड नक्की बदलेन, ट्राय तर करून पहा…

५. तुमच्या रूममध्ये काहीतरी बदल करा. जसं की एखाद्या कपाटाची जागा , तुमच्या बेडची जागा , थोडं तरी शिफ्टिंग करा, एखाद नवीन वॉल हैंगिंग ,तुमचा एखादा छान फोटो बनवून घरामध्ये लावा. बस थोडा आयुष्य स्वतःच्या आनंदासाठी जगा.

६. काहीतरी चिंता सतावत असेल, कुठली तरी अशी गोष्ट असते की कितीही आनंदात असलं तरी ती मनाला दुःखच देत असते. चिंता करायला भाग पाडते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा , या जगात कोणतीही गोष्ट तशीच कायम राहत नसते . कधीतरी त्यात बदल होणार आहे. कधीतरी तुमच्यावर आलेलं संकट नक्कीच दूर होईल. थोडी वाट पहा आणि आज स्वतःच्या मनाला सांगा की लवकरच ती वेळ येईल जेव्हा मी या संकटातून बाहेर पडेल.

७. प्रत्येक वेळी आवडत्या माणसासोबत वेळ घालवल्याने तुमचं मन हलकं होईल असं होत नसतं. एक दिवस फक्त स्वतःबरोबर घालावा. हवं तर ढसाढसा रडून घ्या , पण मन मोकळं करा.

८. तुमच्या आवडीचे चित्रपट पहा, त्यासाठी बाहेरच जायला हवं असं नाही . घरीच तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट बघा. निवांत झोपून पहा . जगाच्या वेगाशी जी स्पर्धा करत आहात तो वेग थोडा दोन दिवस थांबवा . काहीही फरक पडत नाही.

९. तुम्हाला कोण पसंत करत नसेल , तुमचा राग राग करत असेल , तर त्याची काळजी तुम्ही का करता ? ज्याच्या त्याचा प्रश्न असतो. तुम्ही स्वतःवर प्रेम करा. बाकीच्यांनी केलं … नाही केलं त्याचा फरक पडू देऊ नका.

१०. दोन दिवसानंतर तुमच्या मेंदू वरचा ताण नैराश्य नक्कीच गेल असेल. आता ऑफिसला जा, तुमच्यामुळे किती काम आडलं होतं हे सांगायला तुम्हाला दहा लोक येतील. आणि गृहिणींनो तुमच्याशिवाय तर घर कधीही चालू शकत नाही. बस ब्रेक कधीतरी गरजेचा असतो , म्हणजे तुमची किंमत कळते… , तुम्हाला स्वतःलाही आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही…

Share This News

Related Post

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

Posted by - September 26, 2022 0
पुणे : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च…

मोठी बातमी : MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार !

Posted by - February 23, 2023 0
पुणे : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू…

बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - December 15, 2022 0
पुणे : बाणेर व बालेवाडी येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण…

Decision of Cabinet meeting : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापना

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात…

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध– उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - March 13, 2022 0
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *