विनयभंग म्हणजे काय ? गुन्हा सिध्द झाल्यास आरोपीला काय शिक्षा होते ?

498 0

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड यांनीच ट्विट करून ही माहिती दिली.”पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354 चे. मी या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार अशी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून माहिती दिली. पण विनयभंग म्हणजे काय? भारतीय दंड संहितेत कोणती कलमं विनयभंगाशी संबंधित आहेत? विनयभंगाचा गुन्हा सिद्ध झाल्यास काय शिक्षा होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या टॉप info तून

भारतीय दंड संहितेत कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो.यामध्ये प्रामुख्याने एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, या प्रकाराला विनयभंग असं म्हटलं जातं.विनयभंगाच्या बाबतीत अनेक उप-कलमांचाही कायद्याचे जाणकार उल्लेख करतात.कलम 354 अंतर्गत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास 1 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.कलम 354-अ अंतर्गत, एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी करणे, याचा समावेश विनयभंगामध्ये होतो.

यापद्धतीचा गुन्हा शिक्षा झाल्यास 3 वर्षांची शिक्षा होते.कलम 354-ब अंतर्गत, एखाद्या महिलाचा विनयभंग करण्यासाठी तिच्यावर हल्ला केल्यास आणि गुन्हा सिद्ध झाल्यास 3 ते 4 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.”कायद्यात उद्देश अत्यंत महत्त्वाचा असतो. एखाद्या ठरावीक उद्देशाच्या दृष्टीने कृती केली, तर तो गुन्हा ठरू शकतो.”विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये तक्रारदार स्त्रीला व्यक्तिगतरित्या काय वाटलं, यावर खूप काही अवलंबून असतं.एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा करणे, एखादी गोष्ट किंवा वस्तू दाखवणे, महिलेच्या खासगीपणाचे उल्लंघन करणारे वर्तन करणे, अंगविक्षेप करणे, एकसारखे अश्लील शब्द वापरणे अशा गोष्टी विनयभंगाखाली येऊ शकतात.

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Posted by - January 22, 2024 0
मुंबई : देशासह राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता (Maharashtra Weather) वर्तवण्यात आली आहे. बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे…
Sharad Pawar

पवारांनी आमदारांचे टोचले कान; महाविकास आघाडी एकसंध ठेण्याचे केले आवाहन

Posted by - May 17, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद…

‘गृहमंत्री उत्तम काम करतात’, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022 0
मुंबई- भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा उफाळून आली आहे.…
ST-Bus

मोठी बातमी ! दोन महिन्यांनंतर एसटीमध्ये सुरु होणार कॅशलेस सुविधा

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या दोन महिन्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात इबी कॅश (Ebi Cash) या…

रोमानियाहून 219 भारतीयांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने रवाना

Posted by - February 26, 2022 0
नवी दिल्ली- युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. रोमानियाहून 219 भारतीयांना घेऊन विमान मुंबईला रवाना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *