नवविवाहित तरुणाने लग्नात आलेले गिफ्ट उघडले…. पुढे काय झाले तुम्हीच वाचा

424 0

नवसारी- लग्नकार्य उरकले की सगळ्यांना उत्सुकता असते की लग्नामध्ये काय काय गिफ्ट आले ते पाहण्याची. पण गुजरातमध्ये एका नवविवाहित तरुणाला लग्नात आलेले गिफ्ट पाहणे भयंकर महागात पडले आहे. लग्नात आलेले गिफ्ट फोडताच प्रचंड मोठा स्फोट झाला. आणि या स्फोटात हा तरुण गंभीररीत्या भाजला आहे. ही घटना गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

मिंधबारी गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, लतेश गावित यांचे एक-दोन दिवसांपूर्वी दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वांसदा तालुक्यातील गंगापूर गावातील एका मुलीसोबत लग्न झालं. या जोडप्याला त्यांच्या लग्नात नातेवाईक आणि मित्रांनी भेटवस्तू दिल्या होत्या. मंगळवारी सकाळी गावित त्यांचा पुतण्या जियानसह या भेटवस्तू फोडत असताना त्यामध्ये एक खेळणे आढळून आले. रिचार्ज करण्यायोग्य हे खेळणे पाहून त्यांनी हे खेळणे रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. अचानक मोठा स्फोट होऊन दोघेही गंभीररीत्या भाजले.

गावित यांच्या हाताला, डोक्याला आणि डोळ्यांना जखमा झाल्या आहेत, तसेच उजव्या हाताच्या मनगटाचाही भाग कापला. 3 वर्षीय जियानच्या डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नवसारीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर वेगळीच माहिती समोर आली असून हे खेळणे त्यांना कोयंबा येथील रहिवासी राजू पटेल यांनी भेट दिल्याचे समजले. राजू पटेल याचे वधूच्या मोठ्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानेच हे घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Share This News

Related Post

Sharad Pawar And Supriya Sule

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला…
Top News Marathi Logo

#PUNE : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट उमेदवार देणार ? संजय राऊत यांनी सांगितले, कसबासाठी….

Posted by - January 25, 2023 0
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर आता राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. दोन्हीही विधानसभा मतदारसंघांमध्ये…

#AURANGABAD : सुभेदारी शासकीय विश्रामगृहाचे व्यवस्थापक रशीद शेख व इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते विवेक जगताप

Posted by - March 6, 2023 0
याप्रकरणी दोषींवर कारवाई करून शासनास अहवाल सादर करा, सार्व. बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंत्यांना आदेश औरंगाबाद : येथील सार्वजनिक…
SBI

SBI सह ‘या’ 5 बँकांना एकाचवेळी कोट्यवधींचा गंडा; नेमके काय घडले?

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : तुम्ही जर बँकमध्ये पैसे जमा करून ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या बँकेच्या बाबतीत एक धक्कादायक…
Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवावे : डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - July 31, 2023 0
आळंदी : भाविकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध विकास आराखडा बनवावा तसेच देवस्थानच्या विकासाकरिता लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *