heavy Rain

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढचे 3-4 तास धोक्याचे; मुंबईसह ‘या’ भागांना देण्यात आला अलर्ट

538 0

मुंबई : पावसाने आता ठिकठिकाणी जोर धरायला सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या काही तासांमध्ये राज्याच्या काही भागांत धुवांधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

उत्तर रायगड मुंबई आणि उपनगरं, आजूबाजूच्या काही भागांवर ढग तीव्र असून यामुळे पुढच्या 2-3 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील काही भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस होईल तर गोव्यातही पुढच्या काही तासांमध्ये तुफान पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Posted by - May 6, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावर शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने…
Eknath Shinde Sad

Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना

Posted by - April 8, 2024 0
मुंबई : राज्यातील जागा वाटपाचा (Loksabha) तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी हे…

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर आता ‘लालपरी’चं धावणं बंद ! कमी प्रवासी भारमानामुळं एसटी महामंडळाचा निर्णय

Posted by - January 4, 2023 0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत. कमी झालेलं प्रवासी भारमान आणि टोलचा भार असा दुहेरी फटका…

#PUNE : शिवसेना-वंचित आघाडी युतीच्या घोषणेचे पुण्यात कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत

Posted by - January 23, 2023 0
पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *