फेसशिल्ड घालून चंद्रकांतदादा जत्रेत ! शाईफेक हल्ल्यापासून बचावासाठी लढवली अनोखी शक्कल !

208 0

पिंपरी चिंचवड : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर पुन्हा शाईफेक हल्ला होऊ नये म्हणून अनोखी युक्ती लढवल्याचं पाहायला मिळालं. पवना थडी जत्रेच्या उद्घाटनासाठी चंद्रकांतदादा चक्क फेस शिल्ड घालून पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दाखल झाले.

 अधिक वाचा : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी यात्रेला भेट; समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक-पालकमंत्री

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं पिंपरी-चिंचवडमध्ये दहा डिसेंबर रोजी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा चंद्रकांत पाटील पवना थडी जत्रेच्या उद्घाटनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दाखल झाले. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता विकास लोले यानं पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर शाई फेकण्याची धमकी दिली होती. त्यामुळं खबरदारी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. तरी देखील आपल्यावर कुणी शाई फेकून हल्ला करू नये म्हणून चंद्रकांत पाटलांनी आपल्या चेहऱ्यावर फेस शील्ड परिधान केली होती.

अधिक वाचा : ‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पोस्ट सांगवी’; चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी !

Share This News

Related Post

Kishori Pednekar

Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स

Posted by - January 19, 2024 0
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना देखील ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे.…

‘हिजाब’ प्रकरणी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई काय म्हणते ?

Posted by - February 9, 2022 0
उडुपी- कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यावरून वाद चिघळला. त्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलन उसळले. आता या वादामध्ये नोबेल शांतता पारितोषिक…

फरार मेहुल चोक्सीच्या नाशिक येथील जमिनीवर आयकर विभागाची टाच

Posted by - April 18, 2022 0
नाशिक- पीएनबी घोटाळ्यातील आरोपी फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळील मुंढेगावात असलेल्या बळवंत नगर मधील 9 एकर…

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - January 13, 2023 0
यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय…

मनाची अंघोळ : जेव्हा कोणत्याही कारणाने मनस्थिती खराब होते…! मनस्ताप दूर ठेवण्यासाठी सिम्पल टिप्स

Posted by - August 25, 2022 0
आयुष्यामध्ये असे बऱ्याच वेळा घडते की , एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे विनाकारण आपलाच मनस्ताप होतो. तर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे प्रचंड संताप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *