“सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू, पण महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये…!” उपमुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना इशारा

181 0

मुंबई : सध्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये एका नवीन वादाची ठिणगी पडली. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना थेट इशारा दिला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, “राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वी देखील ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. अनेक वेळा कोर्टात हजर राहत नाहीत. म्हणून वॉरंट निघतात. ते खोटं बोलत आहेत, त्याचं उत्तर मात्र आम्ही निश्चितपणे देऊ. मला असं वाटतं मीडियाचा लक्ष वेधून घेण्यासाठी अशी विधान केली जात असावीत. सुरुवातीला मीडियाचं विशेष लक्ष नव्हतं, माध्यमात चर्चा व्हावी यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काही केलं तर ठीक आहे. पण कायद्याच्या चौकटी बाहेर काही केलं तर त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. राहुल गांधी यांची यात्रा सुरू आहे. आम्ही सुरक्षा दिली आहे, सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू, पण महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.” असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

CRIME NEWS : जेवणात मीठ जास्त पडलं म्हणून ठार मारलं! आचाऱ्याच्या खूनप्रकरणी ढाबाचालक भावंडांना अटक

Posted by - December 9, 2022 0
पिंपरी-चिंचवड : जेवणात मीठ जास्त पडल्याच्या किरकोळ कारणावरून ढाबा चालकानं आपल्या आचाऱ्याचा खून केला. पिंपरी-चिंचवड मधील चाकण पोलीस ठाण्या अंतर्गत…

“Ego उद्धव ठाकरेंना नाही , देवेंद्र फडणवीस यांनाच आहे …!” सुनील राऊत यांची सडेतोड प्रतिक्रिया

Posted by - August 12, 2022 0
मुंबई : कांजूर मार्गामध्ये मेट्रोची कार शेड केली जात होती. ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे अशी टीका उपमुख्यमंत्री…
PM Kisan

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता

Posted by - June 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan…

अखेर ठरलं! महादेव जानकर परभणीतून लढवणार लोकसभा निवडणूक

Posted by - March 30, 2024 0
माझी पशुपालन व दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 24 मार्च रोजी महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय जाहीर…

पुणे शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी ; वाचाच सविस्तर

Posted by - September 13, 2022 0
पुणे : पुणे आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. सुरु असलेली पुणे मेट्रोची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *