VIDEO : खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

226 0

नागपूर : आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी खाते वाटप आणि इतर विषयावर स्पष्टीकरण दिले . यावेळी ते म्हणाले कि , खाते वाटप लवकरच होईल, काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल.तोवर तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खाते वाटप करत आहात. आम्ही पेपर फोडून टाकलं तर तुम्हाला काम नाही मिळणार.

कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्याचा वाद असल्याने तो प्रकरण हायकोर्टात सुरू आहे.मेट्रो कारशेडची जागा मेट्रो थ्री करिता मागितलेली आहे.तर कांजूर मार्गची जागा मेट्रो सिक्स साठी मागितली आहे. कांजूरमार्ग ची जागा मेट्रो थ्री साठी योग्य नाही हे आमच्या काळातल्या कमिटीने तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या हाय लेवल कमिटी ने ही स्पष्ट अहवाल दिले होते की कार शेड आरे मध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्ग मध्ये नेलं, तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षाचा उशीर होईल.

मला असं वाटतंय त्यांनी उद्धव ठाकरे फक्त इगो करिता कांजुर मार्ग धरून ठेवला. मेट्रो कार शेड करिता आरे मध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचा 29 टक्के काम पूर्ण झाला आहे.तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झाला. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहे आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही.

Share This News

Related Post

Devendra Fadanvis Tension

Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Posted by - May 5, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे केलेल्या एका…

सुप्रीम कोर्टाचा नुपूर शर्मा यांना दिलासा ; अटकेची याचिका मागे घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला

Posted by - September 9, 2022 0
दिल्ली : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा…
Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद नाही

Posted by - January 2, 2024 0
जालना : मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याला सुरुवात केली. या नोंदी शोधत असताना…

#ज्योतिषशास्त्र : कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अफाट यश; मीन राशीत गुरू आणि बुधाची युती, या 5 राशींची होणार भरभराट

Posted by - March 16, 2023 0
ज्योतिषशास्त्रानुसार आज सकाळी 2023 वाजून 10 मिनिटांनी बुधाने कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश केला आहे. गुरू आधीच मीन राशीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *