Baba maharaj Satarkar

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

1627 0

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच, उद्या (शुक्रवार, 26 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वारकरी सांप्रदायामध्ये बाबा महाराज सातारकर यांना विशेष आदर होता. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे.

बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

Share This News

Related Post

राहुल गांधी यांना आणखी एक झटका ! ब्रिटनमध्ये आणखी एक मोदी दावा ठोकणार

Posted by - March 30, 2023 0
मोदी आडनावावरून टीका केल्याचा फटका राहुल गांधी यांना बसला आणि त्यांना खासदारकी गमवावी लागली. राहुल गांधी याचे राजकीय अस्तित्व धोक्यात…

मुंबई पाठोपाठ पुणे प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Posted by - August 22, 2022 0
पुणे : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत . अशातच सातत्याने प्रभाग रचनेत होणारे बदल यामुळे प्रथापित नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार…

आसनसोल पोटनिवडणुकीत बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा होणार का बाबू मोशाय ?

Posted by - April 12, 2022 0
कोलकाता- एकेकाळी भाजपमध्ये मंत्रिपद उपभोगलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवत आहेत. तीन राज्यांतील…

पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Posted by - April 9, 2023 0
राज्यात परवापासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. काल तर मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. आज पुण्यात अवकाळी…

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया

Posted by - August 6, 2022 0
नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत असून आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *