ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना 2023 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

783 0

पुणे : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३  वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.

जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्कराचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे. सलग ३३ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला.  स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले  स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

त्यामध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे. यापूर्वी विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या ३३  ज्येष्ठ पुणेकरांना गौरविण्यात आले आहे. तर महामहिम माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी, खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सर्वच माजी मुख्यमंत्री, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती, शरद यादव, नितीन गडकरी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं.अमदजअली खान आणि पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.

Share This News

Related Post

राज्य सरकार यापुढे असेच लोकहिताचे निर्णय घेत राहील; मनसेच्या एकमेव आमदाराने मानले राज्य सरकारचे आभार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…

राज्यसभेसाठी अशी होते निवडणूक, जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - May 27, 2022 0
नवी दिल्ली – महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी 10 जूनला मतदान होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया कशी होते याची उत्सुकता…

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून हत्याच ! आरोपीची कबुली, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - February 15, 2023 0
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात वादाची नवीन ठिणगी पडली आहे. दरम्यान संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाल्यामुळे…
Shakuni Mama

महाभारतातील शकुनी मामा म्हणजेच गूफी पेंटल यांचे निधन

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून…

महादेव जानकर वाढवणार भाजपाची डोकेदुखी ?; बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार

Posted by - September 11, 2022 0
बारामती: भारतीय जनता पक्षानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 अभियान सुरू केलं असून या बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *