SIDHARTH SHIROLE : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’ !

366 0

पुणे : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनासोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा असे आव्हान भाजपचे  सिद्धार्थ शिरोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले. अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने केवळ वाट्याचाच विचार केल्याने घाटा सोसण्यास तयार नसलेल्या कंपन्यांनी महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली, असा आरोपही सिद्धार्थ शिरोळे यांनी केला.

आघाडी सरकारमधील पक्षांचे कार्यकर्ते खंडणी वसुली करत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, याची आठवण करून देत श्री सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, वेदान्ता-फॉक्सकॉन कंपनीसोबत चर्चा करण्याऐवजी वाटाघाटी साठीच ठाकरे सरकारचा पाठपुरावा सुरू झाल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याखेरीज या कंपनीला पर्यायच राहिला नसावा. फडणवीस सरकारच्या काळात गुंतवणुकीसाठी अव्वल असलेल्या महाराष्ट्रातून गाशा गुंडाळायला मविआ सरकारने भाग पाडल्याने गुंतवणुकीला मोठा फटका बसला असून पुन्हा महाराष्ट्राचे अव्वल स्थान मागे पडले, आणि महाराष्ट्राची जागा कर्नाटकने घेतली.

मविआ सरकारच्या वसुली धोरणाचा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने धसका घेतला, असेही ते म्हणाले. राज्यातील प्रत्येक विकास प्रकल्पास विरोध करून वसुली आणि तोडपाणी करण्याची सवय महाराष्ट्राला नवी नाही, असा टोलाही त्यांनी मारला. सरकारमधील तीन पक्षांचे समाधान करणे परवडत नसल्यामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा. गेल्या अडीच वर्षांतील धोरण लकवा आणि वसुलीच्या तगाद्याला कंटाळून अनेक गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविली असून मविआ सरकारच्या वसुली धोरणामुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

ठाकरे सरकारच्या काळात ओलाचा प्रकल्प अधांतरी राहिला, टेस्लाने पाठ फिरविली, एमआयडीसीमधील किती उद्योग ठाकरे सरकारच्या काळात बंद पडले, यावर संशोधन करायला हवे. दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारवर आगपाखड करून आपल्या पापावर पांघरुण घालणाऱ्या मविआने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

Share This News

Related Post

” राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज व गाडगेबाबा भारतीय संस्कृतीचे खरे रक्षक…!” खासदार श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन

Posted by - January 30, 2023 0
विश्वशांती घुमटामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्त्वज्ञ संत गाडगे महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण पुणे : “ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व…
Murder

Pune Crime : धक्कादायक ! पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा

Posted by - May 2, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime) आळंदीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे.…
SANJAY RAUT

संजय राऊत राजकारणातले प्रेम चोपडा ‘या’ नेत्याने केली टीका

Posted by - May 26, 2023 0
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष अभ्यासक्रम; हरी नरके, भुजबळांचा विरोध

Posted by - November 30, 2022 0
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री गणेश अथर्वशीर्ष यावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात…

सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीदरम्यान ‘त्या’ फोटो मागील सत्य;… म्हणून त्यांनी भिडेंना वाकून नमस्कार केला !

Posted by - November 8, 2022 0
संभाजी भिडे नेहमीच या-ना-त्या कारणाने चर्चेचा विषय ठरतात. नुकताच मंत्रालयामध्ये त्यांनी एका महिला पत्रकारास टिकली लावली नाही म्हणून संवाद साधण्यास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *