वसंत मोरे मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

203 0

पुणे- मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर पुणे महापालिकेतील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राजसाहेबांच्या भाषणामुळे आपण संभ्रमात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले होते. आता पक्षबांधणीसाठी बनवलेल्या पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून वसंत मोरे लेफ्ट झाले आहेत.

राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.

उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र खरे कारण काय असावे याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत.

Share This News

Related Post

वेदांता-फॉक्सकॉनसंदर्भात फडणवीसांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ! अतुल लोंढे

Posted by - November 2, 2022 0
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे…

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राट भरती जीआर रद्द करा – संभाजी ब्रिगेड

Posted by - March 28, 2023 0
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व अग्रेसर राज्य म्हणून भारतात प्रसिद्ध आहे परंतु गेले काही दिवस आपण महाराष्ट्राच्या नावारूपास काळीमा फासणारे…
Sharad Pawar

Sharad Pawar : बैठकीत भावूक झालेल्या ‘त्या’ नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादमध्ये

Posted by - June 7, 2023 0
जाफराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) अनुषंगाने सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जाफराबादच्या…

राणा यांच्या खार येथील घराची मुंबई महापालिकेच्या पथकाकडून आज पाहणी होणार

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.…

धनुष्यबाण कुणाचा ? निर्णय लांबणीवर..! मग अंधेरी निवडणुकीचे काय ?

Posted by - October 7, 2022 0
मुंबई : निवडणूक आयोगामार्फत आज धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कुणाचं हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र सध्यातरी हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *