विद्यापीठात लवकरच ड्रोन विषयक विविध अभ्यासक्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘ड्रोनआचार्य एरियल’ सोबत सामंजस्य करार

212 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी, पदविका अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच ड्रोन तंत्रज्ञान विषयातील ड्रोनआचार्य या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रसेनजीत फडणवीस, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य डॉ.सतीश देशपांडे , विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर, इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. संजय ढोले, कॅप्टन चंद्रशेखर चितळे, ड्रोन आचार्यचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव, सतीश कुलकर्णी, सुहास सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

ड्रोनचा वाढता उपयोग लक्षात घेता भविष्यात या विषयात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात असे सांगत डॉ.अभ्यंकर म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञानातील केवळ ड्रोन पायलट प्रशिक्षणच नाही तर ड्रोन बिल्डिंग, ड्रोन रेपेरींग अँड मेंटेनन्स, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, ड्रोन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, कृषी नियोजन करण्यासाठी ड्रोनचा वापर आणि कोडिंग आदी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर भर देण्यात आला आहे असेही डॉ.अभ्यंकर यांनी सांगितले.

या विषयाची अधिक माहिती पुढील काळात तंत्रज्ञान विभागाच्या संकेस्थळावर जाहीर केली जाईल, असेही डॉ.अभ्यंकर यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Breaking News ! चीनमध्ये आढळला पहिला मानवी बर्ड फ्ल्यूचा रुग्ण, चार वर्षाच्या मुलाला लागण

Posted by - April 27, 2022 0
बीजिंग- चीनमधील हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला आहे. प्रथमच मानवामध्ये हा संसर्ग आढळून आल्यामुळे भीतीचे…

पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना आठवडाभरात होणार जाहीर होण्याची शक्यता

Posted by - May 9, 2022 0
पुणे- सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली…

पिंपरी चिंचवडमध्ये नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

Posted by - April 18, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण…

अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

Posted by - May 3, 2022 0
पुणे – सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक करण्यात आला. मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला…
Odisha Train Accsident

Odisha Train Accident : ओडिसा रेल्वे अपघातप्रकरणाला वेगळे वळण ? CBI चौकशीनंतर ज्युनिअर इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता

Posted by - June 20, 2023 0
ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातला (Odisha Train Accident) वेगळे वळण लागले आहे. या घटनेशी संबंधित एक सिग्नल ज्युनिअर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *