पैसे उकळण्यासाठी सायबर हॅकरकडून चक्क पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर !

191 0

पिंपरी-चिंचवड : एका सायबर हॅकरनं काही पोलीस अधिकाऱ्यांकडून बेकायदा पैसे उकळण्यासाठी चक्क पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा नावाचा वापर केल्यानं एकच खळबळ उडालीये.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावानं सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून त्या माध्यमातून त्यांच्याच पोलीस अधिकाऱ्यांकडं गिफ्ट कार्डसाठी पैसे मागणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या या फेक अकाउंटमध्ये पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो वापरून एक मोबाईल नंबर देण्यात आला आज त्या नंबरवरून पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यामधील काही पोलीस निरीक्षकांना गिफ्ट कार्डसाठी पैसे मागितले.

पोलीस आयुक्तांच्या नावानं तयार करण्यात आलेल्या या फेक अकाउंटवरील मोबाइल नंबर हा तामिळनाडूतील संजय कुमार या व्यक्तीच्या नावे दाखवत आहे. चिंचवड पोलीस आणि सायबर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

खोटे सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू; चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीला इशारा

Posted by - November 4, 2022 0
महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती…

रुपाली पाटलांचा नारायण राणेंना दम, म्हणाल्या, ‘बेडकासारखे आलात कुठून ? कडेकडेने निघा’

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार साहेबांना पोकळ धमक्या देऊ नयेत, तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय, की…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : इतिहास ! इतिहास ! इतिहास ! अखेर भारत चंद्रावर पोहोचला…

Posted by - August 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने आज एक मोठा इतिहास रचला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर यशस्वीपणे लँड झालं आहे.…
Nashik

Ban On PoP Ganesh Idol : यंदा गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी, नाशिक महापालिकेचा निर्णय

Posted by - July 28, 2023 0
नाशिक : यंदा गणरायाचे आगमन उशिरा होणार आहे. तरीदेखील आतापासूनच सगळ्यांना गणरायाच्या आगमनाचे (Ban On PoP Ganesh Idol) वेध लागले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *