मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार राज ठाकरे यांची भेट ; मनसे-भाजप युतीचे संकेत ?

296 0

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच नवीन खळबळ उडवणारी घटना घडते आहे. सर्वप्रथम भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह हात मिळवणी करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर पक्षांतर्गत क्लेशातून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर पडले आणि पुन्हा एकदा भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली. आता सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत हात मिळवणी केली.

रोजच राजकारणात उलथापालथ सुरूच आहे. अशातच आता भाजप आणि मनसेची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री गणेशाच्या दर्शनासाठी आमंत्रण देण्याच्या कारणाने राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतलं. या सर्वच हालचाली मनसे भाजपच्या युतीचे संकेत देत असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आपल्या मुंबई दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे भविष्यामध्ये महापालिका निवडणुका पाहता आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाजपच्या बड्या नेत्यांची भेटीगाठी पाहता मनसे भाजप युती होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरेंचा पुणे दौरा; मनसेच्या गोटात तणाव; ‘त्या’ पत्रानंतर राज ठाकरे यांची कशी असणार भूमिका…

Posted by - December 27, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक सणसणीत पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. अर्थात नक्की…
Sangli News

Sangli News : वडिलांना घरी थांबवून मोटर पाण्यात ठेवायाला गेला अन्.., 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 21, 2023 0
सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Sangli News) विजेचा शॉक लागून आटपाडीमध्ये…
Supriya Sule

Supriya Sule : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Posted by - October 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शांततेत उपोषण आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे आरक्षण…

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले – चंद्रकांत पाटील

Posted by - May 14, 2022 0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई…
Eknath, Ajit, Devendra

TOP NEWS MARATHI POLITICAL SPECIAL : खातेवाटपाचा तिढा कायम; ‘या’ कारणांमुळे रखडले आहे खातेवाटप

Posted by - July 13, 2023 0
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील होण्याचा घेतला राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली नवनिर्वाचित मंत्र्यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *