पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

688 0

मुंबई : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम (पीएन 25) लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी 1200 मीटर रस्त्याचे, तर डिसेंबरपर्यंत 4.5 किमी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्यापचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चच्हाण यांनी सांगितले.

सदस्य संजय जगताप, छगन भुजबळ, चंद्रकांत भिंगारे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे 962 ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याच्या कामाबाबातचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्त्याच्या कामाला हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. सध्या या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून वाहनांची या रस्त्यावरुन ये जा करण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पण तात्पुरते काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात 1200 मीटर रस्त्याचे काम तर डिसेंबरपर्यंत 4.5 किमी रस्त्याच्या पॅचचे काम, पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या 25 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात येईल. 1200 मीटर लांबीमध्ये 7 मीटर रुंदीचे काँक्रीटीकरणाचे काम मार्च 2023 च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

Share This News

Related Post

धक्कादायक : प्रेमात झाले किरकोळ वाद; प्रेयसीवर केला थेट धारदार शस्त्राने वार, पुण्यात थरार

Posted by - November 9, 2022 0
पुणे : पुणे पुन्हा एकदा एका भयंकर हत्याकांडानं हादरल आहे. पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा तिच्या प्रियकरानं धारदार शस्त्राने…
Supriya And Amol

Loksabha News : लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे निलंबन

Posted by - December 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या (Loksabha News) हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ…
Weather Update

Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान खात्याने दिला ‘हा’ नवीन अलर्ट

Posted by - May 8, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि…

रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

Posted by - May 31, 2022 0
अहमदनगर – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार्यास अटक करण्यात आली आहे. त्याला आज…

नात्याला काळिमा फासणारी घटना : घरी खेळायला आलेल्या 2 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षीय आजोबाचा अत्याचार; अहमदनगर मधील धक्कादायक घटना

Posted by - February 20, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरी खेळायला आलेल्या एका दोन वर्षाच्या चिमूरडीवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *