Breking News ! पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बाँब सदृश्य वस्तू

298 0

पुणे- पुणे रेल्वे स्थानकावर बाँब सदृश्य वस्तू आढळली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे.
तसेच संपुर्ण परिसर सील करण्यात आला आहे. बाँब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वे वाहतूक देखील काही काळ थांबविण्यात आली आहे. 

पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. पुणे स्टेशनवर येणाऱ्या गाड्यांना यार्डमध्ये थांबवण्यात आलं आहे. संपूर्ण परिसरात पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दिसत आहे. परिसरात तणावाचं वातावरण आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता देखील रेल्वे स्थानकात दाखल झाले त्यांनी परिसराची पाहणी करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, “आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन नसल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास करत आहोत. पॅनिक होण्याची गरज नाही.”

चार ते पाच दिवसांपूर्वी पुणे नियंत्रण कक्षात निनावी कॉल आला होता, ज्यात पुणे रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. तपास केला असता तो फेक कॉल असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आज पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

 

Share This News

Related Post

Cricket Retirement

Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा धक्का ! 5 व्या टेस्टपूर्वी ‘या’ स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील (Cricket Retirement) अखेरचा सामना 7 मार्च रोजी होणार आहे. मात्र…

एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराला मंत्रीपद; मंत्रीपदासाठी फोन आलेले खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? वाचा सविस्तर

Posted by - June 9, 2024 0
आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी वेळी काही मंत्रांचा शपथविधी देखील होणार आहेत.…
Wardha Crime

Wardha Crime : गावात दहशत पसरवणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनी ‘या’ पद्धतीने शिकवला धडा

Posted by - August 11, 2023 0
वर्धा : वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Wardha Crime) कारागृहातून जामिनावर आल्यानंतर गावात दहशत…

#PUNE CRIME : ” पोलीस ठाण्यात चल तुला दाखवतो…!” बस पुढे घेण्याच्या किरकोळ कारणावरून पुणे ग्रामीण पोलिसाची PMP बस चालकाला बेदम मारहाण

Posted by - January 31, 2023 0
पुणे : बस पुढे घेण्याच्या किरकोळ कारणावरून पुणे ग्रामीण पोलिसाने पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *