मुंबईतील अनधिकृत फिल्म स्टुडिओ जमीदोस्त, किरीट सोमय्यांचा ‘या’ नेत्यांवर आरोप

847 0

मुंबईतील मढ परिसरात हजारो कोटी खर्च करून उभे करण्यात आलेले फिल्म स्टुडिओ जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. हे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे स्टुडिओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानेच उभे केल्याचा आरोप केला आहे.

किरीट सोमय्या प्रतीकात्मक कुदळ आणि फावडं घेऊन पाडकामाच्या ठिकाणी पोहोचले. किरीट सोमय्या म्हणाले, ” आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या बांधकामाला परवानगी दिली होती. स्टुडिओ मालकाने कोर्टात याचिका रद्द करण्याची मागणी केली. राजकारण बाहेर करा, असं याचिकाकर्त्यांना न्यायालयाने सुनावले. मुंबई महानगरपालिकेच्या आशिर्वादाने या बेकायदेशीर स्टुडिओला परवानगी मिळाली होती त्यांची चौकशी झालीच पाहिजे. आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या भ्रष्टाचाराचं स्मारक उद्ध्वस्त झाले आहे.

मुंबईतील अनधिकृत फिल्म स्टुडिओ जमीदोस्त, किरीट सोमय्यांचा ‘या’ नेत्यांवर आरोप

मुंबईतील अनधिकृत फिल्म स्टुडिओ जमीदोस्त, किरीट सोमय्यांचा ‘या’ नेत्यांवर आरोप

#bollywood #kiritsomiya #unauthorizefilmstudeo #topnewsmarathi #adityathackrey #aslamshaikh #MVAgovernment #bjp #CRZ #BMC #politics #unauthorizeconsrtuction #shivsena #uddhavthackeray

“या बांधकामासाठी आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली. मी केंद्र सरकारकडे जात तक्रार केल्यानंतर त्यांनी विचारलं कोणत्या नियमांतर्गत परवानगी दिली. 22 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली ती बेकायदेशीर होती. दुसरीकडे परवानगी फक्त 6 महिन्यासाठी होती आणि 19 महिने झाले आहेत. स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळं हे तर तुटणारच”, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

किरीट सोमय्या यांचे काय आहेत आरोप ?

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधले.

CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाले.

स्टुडिओच्या बांधकामासाठी बनावट कागदपत्रे, खोट्या परवानगीचा वापर

हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओची उभारणी

Share This News

Related Post

Prerna Tuljapurkar

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Posted by - December 3, 2023 0
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सौ. प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर (Prerna Tuljapurkar) यांची नियुक्ती…
SBI

SBI सह ‘या’ 5 बँकांना एकाचवेळी कोट्यवधींचा गंडा; नेमके काय घडले?

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : तुम्ही जर बँकमध्ये पैसे जमा करून ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या बँकेच्या बाबतीत एक धक्कादायक…

Mumbai Lok Sabha : मुंबईत नरेंद्र मोदी आणि शरद पवार आमने सामने; आज पार पडणार दोघांच्याही प्रचार सभा

Posted by - May 17, 2024 0
मुंबई : राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान पार पडले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. पाचव्या…
Web Series Launch

‘वीर सावरकर सिक्रेट फाईल्स …’ वेब सिरीजची घोषणा, शानदार टिझर आणि पोस्टर लॉन्च

Posted by - May 27, 2023 0
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून…

“चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री…!” – प्रशांत जगताप

Posted by - December 10, 2022 0
पुणे : चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *