उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा कायम राहणार- अजित पवार

283 0

मुंबई- राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन तर काही प्रत्यक्ष हजर होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अजित पवार पवार म्हणाले, “महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार, मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.. सेनेचे काही आमदार परत आले आहेत.. त्यांनी आपली आपबिती सांगितली आहे” असेही अजित पवार म्हणाले.

आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. आमचे सर्व आमदार सोबत आहेत. काही आमचे मित्रपक्ष म्हणतात अजित पवारांनी निधी दिला नाही वगैरे.. सरकार गेल्या अडीच वर्षात काम करतंय..तिन्ही पक्षाचे पालकमंत्री आहेत, कोणाबाबतही दुजाभाव केला जात नाही.. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं होतं. पवार साहेबांनी पुढाकार घेतला, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे सर्व एकत्र येऊन हे सरकार अस्तित्वात आलं.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे मुख्यमंत्र्यांचा हात आहे अशा चर्चा ऐकू येत असताना अजित पवार यांनी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, ” मुख्यमंत्री बंडामागे असतील असं वाटत नाही, त्यांचा स्वभाव नाही. तसेच बंडाच्या मागे भाजप असल्याचं अजून दिसून आलेले नाही असेही पवार यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर’ पडण्याच्या विधानावर अजित पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं विधान केलेलं असावं. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे विचारणा करू.

Share This News

Related Post

Abhijit Bichukale

Abhijit Bichukale : अभिजित बिचकुले झाले डॉ. अभिजित बिचकुले ‘या’ विद्यापीठाने दिली मानद डॉक्टरेट पदवी

Posted by - March 23, 2024 0
पुणे : कसब्याच्या पोट निवडणुकीत तब्बल 47 मते मिळवणारे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. सर्वात…

#NILAM GORHE : प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व…

#DIVORCE : पत्नीपीडित पतीला मिळाली अखेर अश्लाघ्य भाषेत शिव्या देणाऱ्या पत्नीपासून सुटका ! उच्च न्यायालयाने खडसावले, ‘कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता आले पाहिजे… !’

Posted by - February 17, 2023 0
नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपण महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना ऐकल्या वाचल्या असतील. हुंडाबळी, शारीरिक, मानसिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांना…

गायक स्वप्नील बांदोडकर यांचं “सांग प्रिये” रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - March 17, 2022 0
गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या गायक स्वप्नील बांदोडकरनं आता ‘सांग प्रिये’ या नव्या म्युझिक अल्बमसाठी आवाज…

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांची अडीच लाख पदे रिक्त, माहितीच्या अधिकारातून उघड

Posted by - May 25, 2022 0
मुंबई – राज्य सरकारमधील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *