राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

316 0

मुंबई- राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

‘राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2022’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. तसेच शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापाठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

मोठी बातमी : सांगवी फाट्याजवळ दोन पीमपी बसचा समोरासमोर अपघात; बसचालक गंभीर जखमी

Posted by - November 15, 2022 0
पुणे : आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. पुण्यातील सांगावी फाट्याजवळ दोन पीएमपी बसेसचा समोरासमोर अपघात झाला आहे. या…
India vs Bharat Controversy

India vs Bharat Controversy : इंडिया नाही भारत, सरकारी पुस्तिकेत मोदींचा उल्लेख बदलला

Posted by - September 6, 2023 0
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रपत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी (India vs Bharat Controversy) प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला…

SIDHARTH SHIROLE : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’ !

Posted by - September 14, 2022 0
पुणे : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या…

‘हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा’ ; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

Posted by - June 25, 2022 0
मुंबई – हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे…

#CRIME NEWS : जन्मदात्रीनेच घेतला दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव; म्हणाली, “मला संभाळणं असह्य झालं होतं, चिडचिड व्हायची…!”

Posted by - February 14, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये 6 फेब्रुवारीला एक धक्कादायक घटना घडली होती. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन चिमुकले बेशुद्ध झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *