उद्धव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातच पहिली सभा, ठाकरे गटाकडून सभेची जोरदार तयारी

385 0

नाशिक : शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई, ठाणे वगळता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहेत. ठिकठिकाणी सभा घेणार असून जिल्ह्यातील आणि विभागातील निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे विविध विभागांमध्ये जाऊन दौरे करत आहेत.

दरम्यान नुकताच संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दौरा केला आहे. नाशिक मधील एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातच ही सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून या सभेची जोरदार तयारी केली जात आहे.

26 मार्चला सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून नुकतेच शिवसेना ठाकरे गटामध्ये सहभागी झालेले अद्वय हिरे हे या सभेचे नियोजन करत आहेत. नुकतीच या संदर्भामध्ये मालेगाव येथे बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये स्थळ आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. मालेगाव येथील मसगा महाविद्यालय आणि पोलिस कवायत मैदानावर उद्धव ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्राची सभा पार पडणार आहे.

Share This News

Related Post

आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहोचल्या थेट नागपूर अधिवेशनात

Posted by - December 19, 2022 0
नागपूर : आज पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये आरोप प्रत्यारोप होतील, आंदोलने होतील. पण आजच्या पहिल्या…

‘अतिक आणि त्याच्या गुंडांनाही असंच मरण येईल….’ ‘या’ महिलेची शापवाणी खरी ठरली

Posted by - April 17, 2023 0
अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं…

… अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करू, वसंत मोरे यांनी कुणाला दिला इशारा ?

Posted by - April 1, 2023 0
‘आमचे साहेब परप्रांतीयांविषयी बरोबरच बोलतात. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सगळ्या परप्रांतीयांचं नाव खराब करतात. म्हणून आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागते.…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?

Posted by - August 23, 2023 0
मुंबई : अवघ्या काही तासांत भारत एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *