uddhav thackeray

…तर महाराष्ट्र पेटवून टाकू; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

954 0

रत्नागिरी : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच नागरिकांनी बारसू प्रकल्प रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोलगावमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे , फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले जर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका. मी इथ जन की बात ऐकण्यासाठी आलो आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीबाबत दिशाभूल सुरू आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही. मात्र जर हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादणार असाल तर महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरदेखील जोरदार निशाणा साधला. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून अश्मयूगीन काताळ शिल्पाची देखील पहाणी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला आवाहनदेखील केले. ते म्हणाले प्रकल्पाची माहिती हिम्मत असेल तर इथे येऊन द्या तो प्रकल्प ग्रामस्थांना समजावून सांगा आणि ग्रामस्थांनी होकार दिला तरच हा प्रकल्प करा असं आवाहन देखील सत्ताधाऱ्यांना केले आहे. तसेच पोलिसांना बाजूला ठेवून येऊन दाखवा म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंजदेखील दिले आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी : बाराव्या फेरीनंतर 45 हजारांहून जास्त मतं मिळवत ऋतुजा लटके विजयी

Posted by - November 6, 2022 0
मुंबई : मतमोजणीच्या बाराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 45 हजारांहून अधिक मतं मिळाल्याने त्या विजयी ठरल्या आहेत. या फेरीनंतर लटके…
Raksha Khadse

Raksha Khadse : रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचे मोठे विधान

Posted by - April 18, 2024 0
जळगाव : एकनाथ खडसे काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसे यांनादेखील भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही…
Crime

Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव

Posted by - June 2, 2024 0
लातूर : लातूरमधून (Latur Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी…
Satara Accident

Satara Accident : सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे..

Posted by - September 27, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून…

मोठी बातमी ! पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted by - April 20, 2022 0
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *