#PUNE FIRE : शुक्रवारी राञभरात आगीच्या दोन घटना; टिळक रस्त्यावर कॉसमस बॅकमध्ये आणि डेक्कनला घरामधे आग

259 0

पुणे : काल राञी ११•०६ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सदाशिव पेठ, टिळक रस्त्यावर कॉसमस बँकेत आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून जनता व एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तळमजला पाच मजली असणा-या इमारतीत तळमजल्यावर कॉसमस बँकेमधे आग लागली आहे. त्याचवेळी तातडीने ब्रिदिंग एपरेटस सेट परिधान करुन जवानांनी आत प्रवेश करुन कोणी आतमधे अडकले नसल्याची खाञी करत पाण्याचा मारा सुरू करुन आग दहा मिनिटात विझवली. परंतू, मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाल्याने दलाकडील एक्झॉस्ट ब्लोअरच वापर करुन धुर पुर्णपणे बाहेर काढत पुढील धोका टाळला.

सदर आगीमधे बँकेतील कॅश काऊंटर, फर्निचर, पैसे मोजायचे मशीन, संगणक, खुर्ची इत्यादी साहित्य जळाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज आहे. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर व वाहनचालक बजरंग लोखंडे, ज्ञानेश्वर खेडेकर आणि तांडेल संजय जाधव, जवान निलेश माने, किशोर बने, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.

तसेच शनिवारी पहाटे ०४•४२ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात डेक्कन, गोखले इन्स्टीट्युट जवळ एका घरामधे आग लागल्याची वर्दि मिळताच एरंडवणा व कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच तीन खोल्या असलेल्या एका कौलारू बैठ्या घरामधे आग लागली असल्याचे जवानांनी पाहिले. त्याचवेळी घरात कोणी अडकले नसल्याची खाञी करत आगीवर पाण्याचा मारा करुन आग पंधरा मिनिटात पुर्ण विझवली. आगीमधे घरावरील कौलारु छत, गृहपयोगी वस्तु, इलेक्ट्रीक वायरिंग हे पुर्णपणे जळाले. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट किंवा देवघरात पेटणारा दिवा यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी राजेश जगताप आणि वाहनचालक ज्ञानेश्वर खेडेकर आणि तांडेल प्रविण रणदिवे, संजय गायकवाड व जवान किशोर बने, एकनाथ कुंभार, आदेश नाईकनवरे, राकेश नाईकनवरे, देशमुख यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात; धनुष्यबाण चिन्हाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

Posted by - December 12, 2022 0
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच अद्याप देखील सुटलेला नाही. आज शिवसेना आणि शिवसेनेच निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? यावर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला…
Death

मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही सोडले प्राण; मन सुन्न करणारी घटना

Posted by - June 2, 2023 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलाच्या निधनाची बातमी समजताच जन्मदात्या आईनेही आपले…
TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देणाऱ्या BRS पक्षाचा नेमका इतिहास काय आहे?

Posted by - June 24, 2023 0
मुंबई : भारत राष्ट्र समिती पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून (BRS) ओळखली जात होती, हा भारत देशाच्या तेलंगणा राज्यामधील एक…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Posted by - January 15, 2024 0
जालना : मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. अंतरवाली सराटीच्या नादी लागू नका,…
Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे CA ला पडलं महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Posted by - July 2, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *