तिरुपती बालाजी देवदर्शनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन कुटुंबांचा भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू

543 0

पुणे : तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी गेलेल्या दोन कुटुंबांचा कर्नाटक मधील दावणगिरी गावाजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, भरधाव वाहनातील दोन महिला वाहनातून अक्षरशः फेकल्या गेल्या, आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुण्यातील धानोरी येथे एकाच सोसायटीत राहणारे दोन कुटुंब तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक मधील दावणगिरी गावाजवळ या कुटुंबांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मानसी सचिन शेजुळ आणि उज्वला सचिन बर्वे यांचा मृत्यु झाला आहे. तर सचिन बर्वे हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

बर्वे यांचा मुलगा सौरभ बर्वे हा गाडी चालवत होता. दावणगिरी गावातील एका रस्त्यावरून अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीचा वेग अधिक असल्याने गाडीचे नियंत्रण मिळवता आले नाही आणि गाडीने अक्षरशः दोन ते तीन वेळा पलटी घेतली अशी माहिती समजते.

Share This News

Related Post

MLA Pratap Sarnaik : “मुलं आणि सुनांच व्यवस्थित होऊ दे..”, तुळजाभवानी मातेला 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देऊन फेडला नवस

Posted by - November 24, 2022 0
उस्मानाबाद : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीला 75 तोळे सोनं…
Vishal Surendra Agrwal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 28, 2024 0
पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Porsche Accident) विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या पिता-पुत्रांच्या अडचणीत अजून वाढ…
Uday Kotak

Uday Kotak : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा

Posted by - September 2, 2023 0
उदय कोटक (Uday Kotak) यांनी शनिवारी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *