ईडीच्या दोन कर्मचाऱ्यांना मुंबईत अटक, पुण्यातील या व्यापा-याच्या होते संपर्कात; संवेदनशील माहिती लीक केल्याचा आरोप

644 0

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने आपल्या मुंबई कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुप्त फाईल्स लीक केल्याचा आरोप आहे. हे दोन्ही कर्मचारी पुण्यातील व्यापारी आणि सेवा विकास सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मुलचंदानी यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी लाचखोरीच्या तपासाची ‘संवेदनशील’ माहिती दिली होती, असे पुरावे ईडीला मिळाले आहेत. ईडीने आपल्या दोन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त माजी अध्यक्षांच्या एका निकटवर्तीयालाही अटक केली आहे.

मूलचंदानी आणि त्याच्या कुटुंबीयांना अटक

माजी संचालकांविरोधात ईडीच्या कारवाईत अडथळा आणणे आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र पोलिसांनी २७ जानेवारी रोजी मूलचंदानी आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना अटक केली होती.

तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, मुंबईतील ईडी कार्यालयाच्या आवारात एक व्यक्ती नेहमी पाळत ठेवत असे. ईडीने पकडल्यानंतर बबलू सोनकर हा अमर मूलचंदानी यांचा कर्मचारी असून साक्षीदारांना धमकावणे, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ईडीच्या कर्मचाऱ्याला लाचेची रक्कम देण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते.

ईडी कर्मचाऱ्याची कबुली

सोनकरच्या ताब्यातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय ईडीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अमर मूलचंदानी यांना संवेदनशील माहिती देत असल्याची कबुली दिली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

४२९ कोटींचा घोटाळा

सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्यासह काही संचालक मंडळावर ईडीने जानेवारीत कारवाई केली होती. ईडीने त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. सेवा विकास सहकारी बँकेला ४२९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कोणतेही आर्थिक निकष न पाळता सहकारी बँक कुटुंबाच्या मालकीच्या बँकेप्रमाणे चालविली जात होती. ९२ टक्क्यांहून अधिक कर्ज खाती एनपीए झाली आणि आता बँक दिवाळखोरीत गेली आहे.

Share This News

Related Post

Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई ! बनावट कागद पत्रासह 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

Posted by - May 28, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) दहशतवादी विरोधी पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बनावट कागद पत्रासह पाच…

BREAKING : भीमाशंकरवरून येणाऱ्या एसटी बसचा अपघात ; पुलाच्या कठड्यावर बस अडकली म्हणून थोडक्यात बचावले प्रवासी ;पहा PHOTO

Posted by - August 12, 2022 0
पुणे : भीमाशंकर वरून येणाऱ्या एसटी बसचा आज एक विचित्र अपघात घडला आहे . समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या नादात एसटी…
ED

ED : ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Posted by - July 27, 2023 0
नवी दिल्ली: केंद्र सरकारने मागणी केल्याप्रमाणे आता ईडीचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा यांना अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून…

सुप्रीम कोर्टात सुनावणी : शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का ?

Posted by - November 28, 2022 0
महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार…

खर्गे की थरूर; तब्बल 24 वर्षानंतर होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - October 17, 2022 0
नवी दिल्ली: बहुचर्चित अशा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान होत असून मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *