प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड अडीच तास चर्चा; ठाकरे गटासोबतच्या युतीवर…

417 0

मुंबई : काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अडीच तास बंद दाराआड प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरू होती.

या चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती करू नये असा आग्रह मुख्यमंत्री यांनी आंबेडकरांना केला असल्याची माहिती समोर येते आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असताना वंचित गटाचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत यांना म्हटले आहे की, इंदू मिल स्मारक अहवालाच्या संदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे.

या अहवालावर यावेळी चर्चा झाली असून ज्या पक्षासोबत भाजप आहे त्यासोबत आम्ही जाणार नाही. हि आमची भूमिका आम्ही कधीच जाहीर केली होती. भाजपसोबत शिंदे सत्तेत असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. त्यामुळे शिंदे गटासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असे यावेळी सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

तर यापूर्वी देखील 16 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत आले तर राज्यातील इतरही दलित नेते सोबत येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Share This News

Related Post

NIA

ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

Posted by - July 27, 2023 0
पुणे : NIA कडून पुण्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ISIS च्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला पुण्याच्या कोंढवा परिसरातून…

“बघूयात , बारामतीची जनता कुणाला कौल देते ?” अजित पवारांचं भाजपला आव्हान

Posted by - September 8, 2022 0
पिंपरी चिंचवड : भाजपचं बारामतीत स्वागत आहे. बघूया बारामतीची जनता कुणाला कौल देते असं आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार…
Ajit Pawar And Supriya sule

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरूद्ध पवार (Supriya Sule) हा जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. कर्जतमध्ये पार पडलेल्या शिबिरात अजित…

हवामान विभाग : 122 वर्षांचा विक्रम मोडला ! फेब्रुवारीतच सरासरी तापमान 29.5 डिग्री , सांभाळा !

Posted by - March 1, 2023 0
महाराष्ट्र : महाराष्ट्र 2023 मध्ये फेब्रुवारी उलटत नाही तो पर्यंतच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागच्या वर्षी थंडी देखील कडाक्याची…
dheeraj-ghate

Pune News : जिंकण्यासाठी षडयंत्र रचणे हेच काँग्रेसचे चरित्र, भाजपच्या विजयासाठी मतदारच उत्सुक : धीरज घाटे

Posted by - April 20, 2024 0
पुणे : भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, 300 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *